वनखात्याच्या हद्दीतील नाल्यात शेकडो ट्रक वाळू उपसा : खानापूर वनखात्याचे मात्र दुर्लक्ष
वार्ताहर / खानापूर
यावषी झालेल्या मोठय़ा पावसामुळे खानापूर तालुक्मयातील नदी नाल्याच्या ठिकाणी वाळूचा मोठा साठा झाला आहे. परंतु, वाळू उपशाला खानापूर तालुक्मयात बंदी असल्याने अनेक वाळूमाफिया वाळूसाठय़ाच्या ठिकाणी करडी नजर ठेवून आहेत. खासगी जागेत वाळू उपशाला बंदी आहे. केवळ मलप्रभा नदीतील वाळू उपशासाठी लीज मंजूर झाले आहे. त्यामुळे चोरटी वाळू उपसा व वाहतूक यावर प्रशासनाने करडी नजर ठेवली आहे. परंतु खानापूर तालुक्मयाच्या हलशी भागातील पडलवाडी जवळून जाणाऱया एका नाल्यात वाळू उपसा तस्करी मोठय़ा प्रमाणात झाल्याचे दिसून आले आहे. या गावच्या जवळून जाणाऱया तसेच वनखात्याच्या अखत्यारीत येणाऱया नाल्याच्या काठावर शेकडो ट्रक वाळू उपसा करण्यात आली आहे. या संदर्भात वन खात्याकडे काही स्थानिकांनी तक्रारी दिल्या. परंतु, वाळू तस्करी करणाऱया त्या ठेकेदारावर वन खात्याने मात्र कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे. सदर नाल्याच्या काठावर मनुष्यबळाने उपसा करण्यात आलेल्या वाळूचे ढिग त्याठिकाणी दिसत आहेत. सदर वाळू उपसा करण्यासाठी किमान पंधरावडा तरी कामकाज चालेल असे यावरून दिसून येते. परंतु, याकडे वन खात्याने साफ दुर्लक्ष केले आहे का, की जाणीवपूर्वक या वाळू तस्करीला वनखात्याच्या कर्मचाऱयांचा आशीर्वाद आह। असा संशय व्यक्त केला जात आहे.
वास्तविक पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून वाळू तस्करी करण्यात येऊ नये यासाठी प्रशासनाने करडी नजर ठेवली आहे. पट्टा जमिनीतील वाळू उपसा करण्यासाठी अनेकदा सरकारकडे प्रयत्न झाले. पण वाळू उपसा केल्याने जमिनीची झीज होते, पर्यावरणाचा नाश होतो हा उद्देश समोर ठेवून वाळू उपशावर निर्बंध आणले आहेत. वनखाते देखील अशा वाळू उपशाला आजवर विरोध करत करडी नजर ठेवून आहे. परंतु पडलवाडीच्या जंगलात नाल्याच्या काठावर साठा केलेली वाळू तस्करी नेमकी कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे. याचा तपास जिल्हाधिकाऱयांनी करणे गरजेचे बनले आहे. या नाल्याच्या काठावर करण्यात आलेल्या वाळू उपसासंदर्भात खानापूर वन विभागाच्या वन संरक्षण अधिकारी कविता इरणहट्टी यांना समजूनही याबाबत त्यांनी दखल घेऊन गुन्हाही दाखल केला नसल्याचे समजते. परंतु वाळू उपसा करणारा ठेकेदार कोण ? त्याच्यावर अद्याप कारवाई का केली नाही. असा प्रश्न या भागातील नागरिकांतून केला जात आहे.