मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती, पंपहाऊसची केली पाहणी : उद्यापासून पाणीपुरवठा सुरळीत
डिचोली/प्रतिनिधी
पडोसे जलशुध्दीकरण प्रकल्पातील पंप नादुरुस्त बनल्याने सध्या डिचोली तालुक्मयातील बहुतेक ठिकाणी लोकांचे पाण्याविना हाल झाले आहेत. या परिस्थितीची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दि. 14 रोजी संध्याकाळी पडोसे पंपहाऊसला भेट देऊन पाहणी केली. या पंपच्या दुरूस्तीसाठी बेळगाव येथे संबंधितांना पाठविण्यात आले असून आज बुधवारी दुरूस्ती होऊन गुरूवारपासून पाण्याची समस्या सुटणार आहे, असे त्यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
दरम्यान, यावेळी मुख्यमंत्र्यांनी पडोसे प्रकल्पातील जुनी यंत्रणा हटवून त्याजागी अत्याधुनिक यंत्रांसह प्रकल्प साकारण्यात येणार असल्याचेही सांगितले. यावेळी सहाय्यक अभियंता आग्नेलो रॉड्रिगीस, कनि÷ अभियंता आगा व इतरांची उपस्थिती होती.
उद्यापासून पाणीपुरवठा सुरळीत होणार
सदर पंप 1998 मध्ये बसविण्यात आले होते. त्यामुळे त्यात वारंवार नादुरुस्त होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यांची डागडुजी करताना अनेक दिवस लोकांचे पाण्याविना हाल होतात. एका पंपचे नादुरुस्त भाग सांगली येथे पाठविण्यात आले आहेत. तो अद्याप दुरूस्त होत नाही. त्यातच आता दुसराही पंप बिघाडल्याने तो बेळगाव येथे पाठविण्यात आला आहे. आज दि. 15 रोजी तो दाखल होणार आहे. त्यानंतर दि. 16 पासून पाणी पुरवठा सुरळीत होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
प्रकल्पातील कामगारांची केली विचारपूस
या प्रकल्पात गेली अनेक वर्षे काम करणाऱया कंत्राटी कामगरांना सरकारी नोकर भरती सोसायटीत समाविष्ट करून घेण्याच्या निर्णयाला हल्लीच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याने या कामगारांना खऱया अर्थाने मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी न्याय दिला आहे. काल या प्रकल्पाच्या पंपहाऊसवर भेट दिली असता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांंनी तेथे उपस्थित असलेल्या कामगारांची विचारपूस करताना त्यांना पगाराबाबतीत विचारणा केली. व स्थगित राहिलेला पगार लवकरच घालण्यात येणार असल्याचे कामगारांना सांगितले. यावेळी उपस्थित कामगारांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे आभार मानले.