प्रतिनिधी/ पणजी
पणजीतील मेरी इमॅक्युलेट चर्चचे फेस्त कोरोना महामारीमुळे मर्यादित स्वरूपात साधेपणाने करण्यात आले. भाविकांची फारशी गर्दी नव्हती. तथापि, पारंपरिक पद्धतीनुसार अनेक भाविकांनी फेस्ताला हजेरी लावली. यंदा चणेकार, खाजेकार, मेणबत्ती, फुलवाले फेस्तला उपस्थित आहेत परंतु खरेदी विक्रीसाठी मोठय़ा प्रमाणात भरणारी फेरी (दुकाने) मात्र नाहीत. कोरोनाचे संकट अजुही असल्याने अनेक भाविकांनी फेस्ताला जाण्याचे टाळले. जे भाविक दर्शनासाठी आले त्यांची थर्मन गन तपासणी करण्यात आली. पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी चर्चला भेट दिली आणि ते फेस्तात सहभागी झाले.