प्रतिनिधी /पणजी
कार्निव्हल मिरवणुकीसाठी राजधानी पणजी नगरी सज्ज झाली आहे. आज शनिवार दि. 26 फ्sढबुवारी 2022 रोजी दुपारी 3 वाजता ‘खा प्या मजा करा’ या कार्निव्हल चित्ररथ मिरवणुकीला धुमधडाक्यात सुरवात होणार आहे. पणजीत आज पहिली कार्निव्हल चित्ररथ मिरवणूक निघणार असून त्याची तयारी पूर्ण झाली असल्याचे पणजी महानगरपालिका आणि आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
येथील जुने सचिवालय ते कला अकादमी असा चित्ररथ मिरवणुकीचा मार्ग असून हा मार्ग विविध मुखवटे, रंगीत पताका, फ्ढलकांनी सजवण्यात आला आहे. मांडवी तिरी असलेल्या दयानंद बांदोडकर मार्गावरून मिरवणूक जाणार असून जुन्या सचिवालयाकडे त्यास हिरवा बावटा दाखवण्यात येणार आहे.
चित्ररथ मिरवणुकीत ‘किंग मोमो’चा रथ सर्वात पुढे राहणार असून त्यानंतर इतर चित्ररथ एकापाठोपाठ एक असे प्रयाण करणार आहेत. कला अकादमीपर्यंत हे चित्ररथ व इतर पथके वाजत गाजत, नाचत जाणार आहेत. कोरोना संसर्ग नियंत्रणात असल्यामुळे कार्निव्हलचा उत्साह वाढणार आहे. कार्निव्हलसाठी काही देशी, विदेशी पर्यटक राज्यात दाखल झाले असून ते या मिरवणुकीत सहभागी होउढन त्याचा आनंद लुटणार आहेत.