प्रतिनिधी /पणजी
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित चित्र प्रदर्शनाचे आयोजन पणजीतील धेंपो हाऊससमोर मांडवी किनारी करण्यात आले. गोवा प्रदेश युवक काँग्रेसतर्फे त्या प्रदर्शनाची आखणी करण्यात आली आणि काँग्रेस नेते व गोवा निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम यांनी त्या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर, आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, पणजीचे माजी महापौर उदय मडकईकर, युवा काँग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर व इतर काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.