ग्रामीण केंद्रांवरही रुग्णसंख्येत वाढ : लोकांनी काळजी घेण्याची गरज
प्रतिनिधी / पणजी
राज्यात सक्रीय कोरोनाबाधितांच्या संख्येत शनिवारी किंचित घट दिसून आली होती. त्यात रविवारी पुन्हा वाढ होत 265 नव्या रुग्णांची भर पडली. त्याशिवाय हवाई, रेल व रस्तामार्गे आलेल्या बाधितांच्या संख्येतही सतत वाढ होत असून रविवारी 17 प्रवाशी बाधित सापडले आहेत. परिणामी राज्यातील सक्रीय रुग्णसंख्येने 2000 चा आकडा पार केला आहे.
केंद्रवार रुग्णसंख्येच्या बाबतीत पणजी, मडगाव केंद्रांना मागे टाकत पर्वरी केंद्र अव्वलस्थानी पोहोचले आहे. काल दि. 3 एप्रिल रोजी पर्वरी केंद्रात 183 रुग्ण होते, त्यात अचानक वाढ होत आता तेथे सर्वाधिक 207 रुग्ण उपचार घेत आहेत. फोंडा केंद्रातील रुग्णसंख्याही झपाटय़ाने वाढत असून एकाच दिवसात तेथे 40 जणांची भर पडत संख्या 185 वर पोहोचली आहे.
गेल्या 24 तासात 167 जण कोरोनामुक्त झाले असून हे प्रमाण सध्या 95.07 टक्के एवढे आहे. रविवारी एकाचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या 835 वर पोहोचली आहे. आतापर्यंत एकूण 59068 जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यातील 56156 जण बरे झाले. संशयित रुग्ण म्हणून 40 जणांना गोमेकॉत भरती करण्यात आले तर 108 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे.
पर्वरीत सर्वाधिक 207 रुग्ण
सध्या विविध आरोग्य केंद्रात उपचार घेणाऱया रुग्णात सर्वाधिक 207 रुग्ण पर्वरी केंद्रात आहेत. त्या खालोखाल 206 रुग्णांसह मडगाव केंद्र द्वितीय स्थानी तर 199 रुग्णांसह पणजी केंद्र तृतीय स्थानी पोहोचले आहे. त्याशिवाय फोंडय़ात 185, कांदोळीत 152, वास्कोत 129, कुठ्ठाळीत 104, म्हापसा 90, कासावलीत 70, शिवोलीत 64, सांखळीत 60, चिंचिणी व चिंबलमध्ये प्रत्येकी 52, हळदोणे 45, खोर्लीत 42 रुग्ण आहेत. अन्य सर्वत्र 40 पेक्षा कमी रुग्ण आहेत.
हवाई, रस्ता, रेल्वेमार्गे आलेले 17 प्रवाशी बाधित
सक्रीय रुग्णांची केंद्रवार संख्या पुढीलप्रमाणे आहेः डिचोली 34, सांखळी 60, पेडणे 27, वाळपई 03, म्हापसा 90, पणजी 199, हळदोणा 56, बेतकी 18, कांदोळी 152, कासारवर्णे 17, कोलवाळ 30, खोर्ली 42, चिंबल 52, शिवोली 64, पर्वरी 207, मये 07, कुडचडे 32, काणकोण 25, मडगाव 206, वास्को 129, बाळ्ळी 13, कासावली 70, चिंचिणी 52, कुठ्ठाळी 104, कुडतरी 21, लोटली 40, मडकई 13, केपे 16, सांगे 31, शिरोडा 17, धारबांदोडा 23, फोंडा 185 व नावेलीत 36 रुग्ण आहेत. त्याशिवाय हवाई, रस्ता, रेल्वेमार्गे आलेले 17 प्रवाशी बाधित सापडले आहेत.
- 04 एप्रिलपर्यंतचे एकूण रुग्ण 59068
- 04 एप्रिलपर्यंतचे बरे झालेले रुग्ण 56156
- 04 एप्रिलपर्यंतचे सक्रिय रुग्ण 2077
- 04 एप्रिल रोजीचे नवे रुग्ण 265
- 04 एप्रिल रोजी बरे झालेले रुग्ण 167
- 04 एप्रिल रोजीचे बळी 01
- आतापर्यंतचे एकूण बळी 835