प्रतिनिधी/ पणजी
पणजी महानगर पालीका शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना राबवित आहे. केंद सरकारकडून पणजतील प्रभागासाठी 310 शौचालयांचा निधी मंजूर झाला आहे. पण पालिका प्रशासकीय संचालनालयाच्या आडमुटय़ा धोरणामुळे हा प्रकल्प अडकून राहिला आहे, याचा आम्ही मनपातर्पे निषेध करतो, असे यावेळी मनपाचे महापौर उदय मडकईकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मनपाचे पूर्वीचे आयुक्त त्रिपाठी यांनी शहरातील प्रत्येक वार्डामध्ये शौचालयाची फाईल मंजूर करुन पालीका प्रशासनाकडे पाठविली होते. ही फाईल्स गेले चार महिने तिथे sअडून आहे. अगोदर आम्हाला हे शौचालयाचे कंत्राट सुलभ शौचालय या सरकारी एजन्सी मार्फत बांधून दिले जाणार म्हणून सांगितले होते. आता संचालनालयाकडून मनपाला पत्र आले की या शौचालयांसाठी नवीन निविदा काढण्याचे आदेश दिले आहे. जर आम्हाला नवीन निविदा काढायचे होते चार महिन फाईल अडवुन का ठेवली? असा प्रश्न यावेळी महापौरांनी केला. पालीका प्रशासन संचालक जाणून बूजून मनपाचे कामे अडवत आहे. त्यांना कॅसिनो कचरा प्रकल्पासाठी मनपाने मंजूरी दिली नसल्याने ते सुड घेते असल्याचा आरोपही यावेळी महापौरांनी केला.
या प्रकरणी 14 रोजी मनपाच्या नगरसेवकांची खास बैठक घेऊन यावर चर्चा केली जाणार आहे. यासाठी पंतप्रधान, मुख्यमंत्री, शहर विकास मंत्री यांना निवेदन दिले जाणार आहे. पणजी स्वच्छ ठेवण्यास त्यांची सरकारी खाती अडथळा करत असल्याचे त्यांनी सांगितले.
15 दिवस त्या गाडय़ांना परवानगी नाही
पणजी मार्केट जवळील मनपाने ते 14 गाडे हटविले आहे त्यांना अजून पंधरा दिवस परवानगी दिली जाणार नाही. याविषयी मनपाच्या नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांच्यावर योग्य कारवाई निच्छित केली जाणार आहे. ते मनपाच्या सुचनाकडे दुलर्क्ष करत असल्याने मनपा योग्य ती कारवाई करणार आहे. त्यांच्याकडून तो परिसर दुर्गंधीमय बनविले आहे. तो साफ करण्यासाठी अजून 15 दिवस लागणार आहे, असेही यावेळी महापौरांनी सांगितले.
त्या 9 रस्त्यावर डांबरीकरण
पणजी शहरातील अगोदर 9 रस्ते डांबरीकरण केले जाणार आहे. त्या रस्त्यावर सध्या गॅस पाईपलाईन, पाण्याची पाईपलाईन व वीज वाहिन्यांचे खोदकाम सुरु आहे. एकदा डांबरीकरण केल्यावर मनपा त्यांना हे रस्ते खोदण्याची परवानगी देणार नाही. यासाठी त्यांना 31 जानेवारी पर्यत काम पूर्ण करण्याचे मनपाने आदेश दिले आहे. त्यांना हे 9 रस्ते हॉटमिक्स होणार आहे. नंतर अन्य रस्ते हॉटमिक्स केले जाणार आहे, असेही यावेळी महापौरांनी सांगितले.
लवकरच पणजीत पे पार्किग
पणजी शहरात येत्या 15 तरीक पासून पे पार्किग सुरु करण्याचे मनपाने निर्णय घेतला आहे. यासाठी कंत्राट मंजूर करण्यात आले आहे. 1.62 कोटी रुपयांना हे sकंत्राट दिले आहे. जुवारकर असोसिएशन या कंत्राटदाराला तीन वर्षासाठी हे कंत्राट दिले आहे. आता त्यांच्याकडून रस्त्यावर पार्किग काम व चिन्हे लावण्याचे काम केले जाणार आहे. एबी रस्ता, 18 जून रस्ता. चर्च चौक, असे काही रस्ते पे पार्किंग केले जाणार आहे, असेही यावेळी महापौरांनी सांगितले.
पणजी शहरात ज्या बेवारस गाडय़ा पडून आहे त्या लवकरच हटविल्या जाणार आहे. त्यासाठी एक एजन्सी मार्फत या सर्व गाडय़ा मनपा ताब्यात घेणार आहे. एकूण 350 गाडय़ा बेवारस आहे. यामुळे पार्किगला समस्या होत आहे, त्यामुळे लवकरच या गाडय़ा आम्ही हटविणार आहे, असेही महापौरांनी सांगितले.