प्रतिनिधी /पणजी
पणजी महानगरपालिका (मनापा) महापौर उपमहापौर निवडूक आज बुधवार दि. 30 मार्च रोजी सकाळी 11 वाजता मनापा इमारतीच्या हॉलमध्ये होणार असून महापौर पदासाठी पुन्हा रोहीत मोन्सेरात यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे ते बिनविरोध निवडून येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उपमहापौर पदासाठी संजीव नाईक यांचाही एकमेव अर्ज आल्यामुळे त्याची निवडदेखील बिनविरोध होणार आहे. सध्याचे उपमहापौर वसंत आगशीकर यांनी माघार घेतल्याने श्री. नाईक यांना संधी मिळाली आहे.