प्रतिनिधी /पणजी
पणजी शिमगोत्सव समितीतर्फे रविवारी लावणी कार्यक्रमावेळी समितीचे संस्थापक सुरेंद्र काकोडकर, अनिल आंगले व ज्ये÷ भजनी कलाकार गुरुदास शिरगावकर यांचा पणजीचे उपमहापौर वसंत आगशीकर यांच्याहस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्सच्या डेपो व्यवस्थापक, इतर पुरस्कर्ते राजेश खवटे, मनोज काकुलो, नगरसेवक संतोष सुर्लकर व वसंत आगशीकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर समितीचे कार्याध्यक्ष मंगलदास नाईक, सचिव शांताराम नाईक, कोषाध्यक्ष संदीप ए. नाईक उपस्थित होते. केशव नाडकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.