प्रतिनिधी / पणजी
कला आणि संस्कृती खात्यांतर्गत चालवण्यात येणाऱया ‘प्रयोग सांज’ या नाटक सादरीकरण उपक्रमात शनिवार दि. 27 रोजी सायं. 6.30 वा. ‘अपरांत माची’ निर्मित ‘लग्नफेरे’ हे नाटक सादर होणार आहे. ‘लग्नफेरे’ नाटकाचे दिग्दर्शन ज्ञानेश मोघे यांनी केले असून नाफ्ता पुरस्कार प्राप्त ‘वेडी स्टोरी’ या सिनेमावर आधारित आहे. कला अकादमी आयोजित ‘अ’ गटा राज्य नाटय़स्पर्धेत सदर नाटकाला द्वितीय पारितोषिक मिळाले असून नाटकाच्या इतर विभागातही भरघोष यश प्राप्त केलेले आहे. संस्कृती भवनाच्या सभागृहात सादर होणाऱया या प्रयोगाला कला आणि संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळीप तसेच पत्रकार राजू नायक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत. नाटय़प्रयोगाचा कालावधी 2 तास 10 मिनिटांचा असून प्रेक्षकांनी कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.