ग्रा. पं. मार्फत शेतकऱयांना भात बियाण्यांचे वाटप
वार्ताहर / पणदूर:
‘एक गाव-एक वाण’ या उपक्रमांतर्गत पणदूर ग्रा. पं. मार्फत शेतकऱयांना भात बियाणे वाटप करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा शेतीप्रधान आहे. भात हे आपले प्रमुख पीक. ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकऱयांचे संपूर्ण वर्षाचे अर्थकारण बहुतांशी भातशेतीवर अवलंबून असते.
आधुनिक शेतीचा अवलंब केला जात असला, तरीही भातशेतीसाठी पॉवर ट्रीलर व अनेक प्रकारच्या सुधारित व संकरित बियाण्यांचा, रासायनिक खतांचा वापर यापुढे भातशेतीची प्रगती दिसत नाही. त्यामुळे भातशेती करणाऱया सर्वसामान्य गरीब शेतकऱयाला वर्षाला जेमतेम पुरेल एवढे भात आणि जनावरांसाठी गवत या पलिकडे वाटय़ाला काहीही येत नाही. भातशेती करणाऱया आणि त्यावरच वर्षाची उपजीविका असणाऱया शेतकऱयांची ही व्यथा विचारात घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा पणदूर सरपंच दादा साईल यांनी ग्रा. पं. च्या माध्यमातून याबाबत शेतकऱयांना वेगळी दिशा दाखविण्यासाठी गेली पाच वर्षे सातत्याने भातशेतीसाठी वेगळा प्रयोग हाती घेतला आहे.
उपक्रम राबविण्याचा प्रामाणिक प्रयत्न
त्या अनुषंगाने गावातील एकंदर जमिनीचा पोत, पावसाचे प्रमाण व अनिश्चित हवामान याचा विचार करून भातशेती करणाऱया शेतकऱयांना ‘एक गाव एक वाण’ या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
भातशेती लागवडीचे प्रमाण वाढते
त्यातूनच गावातील शेतकऱयांना कृषी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली एकाच प्रकारचे सुधारित भाताचे बियाणे ग्रा. पं. मार्फत अनुदान तत्वावर वाटप, भात शेतीशाळेच्या माध्यमातून भातशेती करण्याचे शास्त्राsक्त मार्गदर्शन, SRI पद्धतीने भात लागवड, सेंदीय खतांचा जास्तीत-जास्त वापर, लावणी, कोळपणी, कापणी आणि भात झोडणीसाठी यांत्रिक उपकरणांचा वापर, सुधारित अवजारांचे वाटप, ताडपत्री वाटप, शेतकऱयांच्या अंगणापर्यत जाऊन सरकारी भात खरेदी, नैसर्गिक आपत्तीवेळी गावातील शेतकऱयांना तातडीची मदत म्हणून कडधान्य, भाजीपाला आणि चारा बियाणे वाटप आदी उपक्रम सातत्याने राबवत आहेत. त्यामुळे दरवषी भातशेती लागवडीचे प्रमाण वाढत असून भातशेती करणाऱया शेतकऱयांचे उत्पादन आणि उत्पन्नातही भर पडली आहे.
शेतकऱयांना सुधारित भातबियाणे वाटप
यंदाच्या वषीही अगदी कोरोनाचे संकट असतानाही पणदूर ग्रा. पं. च्या पंधराव्या वित्त आयोगाच्या अनुदानातून गावातील भातशेती करणाऱया शेतकऱयांना सुधारित भातबियाणे वाटप नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
सरपंच दादा साईल, उपसरपंच बबन पणदूरकर, ग्रा. पं. सदस्य आबा सावंत, सुविधा सावंत, किरण मोरे, मयुरी पणदूरकर, अंकिता राऊळ, अनघा गोडकर, ग्रामसेविका सपना मसके, कृषी सहाय्यक श्रुती कविटकर, तलाठी श्वेता दळवी, पोलीस पाटील देऊ सावंत ग्रा. पं. कर्मचारी काशिराम साईल, दत्तू गोसावी आणि पूनम साईल उपस्थित होते.