संक्रांतीमुळे पतंग खरेदीला उत्साह : मोठय़ा पतंगांपेक्षा लहान पतंगांची विक्री अधिक
प्रतिनिधी /बेळगाव
मकर संक्रांतीला तिळगुळाइतकीच आठवण होते ती पतंगांची. लहान मुले, तरुण पतंग उडविण्यासाठी आधी काही दिवस पतंगांची खरेदी करतात. परंतु सध्या पतंग उडविण्यापेक्षा फोटोशूट करण्यासाठी पतंगांची खरेदी वाढली आहे. लहान आकारात अतिशय सुंदर डिझाईन्समध्ये फोटो शुटसाठीचे पतंग दुकानांमध्ये लक्ष वेधून घेत आहेत. तरुण असो वा लहान मुले यांना हे लहान पतंग भुरळ घालत आहे. त्यामुळे मोठय़ा पतंगांपेक्षा लहान पतंगांची विक्री वाढली आहे.
बेळगावमध्ये मोठय़ा प्रमाणात पतंगांची विक्री प्रतिवषी होते. परंतु मागील काही वर्षांमध्ये पतंग उडविताना घडलेल्या अपघातांमुळे पालक आपल्या मुलांना पतंग घेऊन देण्यास तयार नाहीत. खुल्या जागेत पतंग उडविणे आवश्यक असताना छतावरून पतंग उडविले जात आहेत. यामुळे तोल जाऊन पडून जखमी होणे, विजेच्या उच्चभारित वाहिनीला स्पर्श झाल्याने अपघात होणे असे प्रकार वाढल्याने पतंग उडविण्याची पेझ हळूहळू कमी होत चालली आहे. असे असतानाही बेळगावमध्ये आजही पतंग उडविण्याच्या स्पर्धा घेण्यात येतात. त्यामुळेच संक्रांतीपासून पुन्हा एकदा पतंग खरेदीचा उत्साह वाढला आहे.
5 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत पतंग दाखल
यावषी कागदी व प्लास्टिक पतंगांच्या दरात वाढ झाली आहे. वाढीव इंधनाचा दर व इतर साहित्य महागल्याने 2 रुपयांना मिळणारा पतंग आता 4 ते 5 रुपयांवर पोहोचला आहे. लहान मुलांच्या आवडी, निवडी लक्षात घेऊन मिकी माऊस, कार्टून, छोटा भीम यांची छायाचित्रे असणारे पतंगही बाजारात दाखल झाले आहेत. काही ठिकाणी कापडी पतंग लक्षवेधी ठरत आहेत. पाच रुपयांपासून ते 100 रुपयांपर्यंत प्लास्टिकचे पतंग आकारानुसार विक्री केले जात आहेत. तर चायनीज पतंग 200 ते 300 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. याच सोबत दोरा 5 ते 10 रुपये, तर मोठा रिळ 50 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत दुकानांमध्ये विक्री केला जात आहे.
चायनीज मांजावर बंदीच
चायनीज मांजाला काचेची पावडर लावण्यात येते. त्यामुळे हा मांजा प्राणी पक्षांसह मनुष्यालाही धोकादायक ठरत आहे. या मांजामुळे बेळगावमध्येही अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे या धोकादायक मांजावर केंद सरकारने बंदी घातली आहे. बंदी असूनही विक्री करणाऱयांवर वनविभागाच्या कायद्याखाली कारवाई केली जात आहे. त्यामुळे यावषी चायनीज मांजाची विक्री पूर्णपणे बंद आहे.
ग्रामीण भागात पतंगांची विक्री जास्त
पतंग उडविण्याची पेझ काहीशी कमी झाली आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात पतंगांची विक्री जास्त प्रमाणात सुरू आहे. कागद, प्लास्टिक व वाहतूक खर्च वाढल्यामुळे पतंगांच्या किरकोळ विक्रीत वाढ झाली आहे. तरी देखील हौसेखातर काही तरुण पतंगांची खरेदी करत असल्याची माहिती रूचित मेहता यांनी दिली.
– रूचित मेहता (टीना पतंग)