ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पतंजलीच्या ‘कोरोनिल’ औषधाला केंद्र सरकारने सशर्त परवानगी दिली आहे. कोरोनिल हे कोरोनावरील औषध म्हणून न विकता रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे औषध म्हणून विकावे, असे आयुष्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाने पतंजलीला दिलासा मिळाला आहे.
पतंजलीचे ‘कोरोनिल’ हे औषध तीन दिवसात कोरोना रुग्ण बरा करते, असा दावा करत योगगुरू बाबा रामदेव यांनी हरिद्वारच्या पतंजली योगपीठात मागील आठवड्यात कोरोनिलचे लाँचिंग केले होते. मात्र, आयुष्य मंत्रालयाने बाबा रामदेव यांच्या दाव्यावर आक्षेप घेत औषधाच्या विक्रीला परवानगी नाकारली होती. केंद्र सरकारने नोटीस दिल्यानंतर पतंजलीने आपला दावा मागे घेतला होता.
दरम्यान, आयुष मंत्रालयाने या औषधाची चाचणी घेतली. त्यानंतर या औषधाला रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे औषध म्हणून विक्री करण्यास परवानगी दिली आहे.