स्वदेशी उत्पादनांच्या विक्रीसाठी कंपनी पर्याय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लॉकडाऊनमुळे देशासह जगरातील उद्योगधंदे ठप्प आहेत. यामुळे अन्य मार्गाचा वापर करुन आपला व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी विविध उद्योग क्षेत्र पर्यायी मार्गाचा विचार करत आहेत. यामध्ये आता देशातील योग गुरु बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली आयुर्वेद आपली उत्पादने विकण्यासाठी ई-कॉमर्स प्लॅटफार्म आणण्याच्या तयारीत आहे. सदरच्या सोयीमुळे ग्राहकांना पतंजली उत्पादने घर बसल्या उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
पतंजली या नवीन प्लॅटफार्मचा वापर करुन ग्राहकांच्या जवळपास विकण्यात येणाऱया उत्पादनांची विक्री करण्यात येणार आहेत. तसेच ही उत्पादने ग्राहकांना घरपोच करण्यासाठी काही मिनिटात ही सेवा देण्यात येणार असून ही सेवा पूर्ण मोफत दिली जाणार आहे. सुक्ष्म, स्मॉल आणि मध्यम क्षेत्रांशी संबंधीत असणाऱया उद्योगाला चालना देण्यासाठी स्थानिक उत्पादनांच्या विक्रीवर पतंजलीकडून भर देण्यात येणार आहे. लॉकडाऊनच्या यामुळे सदर क्षेत्रांना दिलासा मिळण्याचे संकेत आहेत.
डॉक्टरांचा मोफत सल्ला
ग्राहकांना मोफत साहित्यांची डिलिवरी करण्यासोबतच पतंजलीचे 1500 डॉक्टरच आरोग्य विषयक मोफत सल्ला देणार आहेत. सोबत योगा संदर्भातही माहिती देण्यावर भर देण्यात येणार आहे. येत्या 15 दिवसांमध्ये हा प्लॅटफार्म सादर करण्यात येणार असल्याचा विश्वास कंपनीने या प्रसंगी दिला आहे.
स्वदेशी उत्पादनांचा समावेश
ई-कॉमर्स प्लॅटफार्म आगामी काळात पतंजली ग्राहकांच्या भेटीला आणणार असून या माध्यमातून कंपनी स्वदेशी उत्पादनांचा पुरवठा ग्राहकांच्या घरापर्यंत मोफत करणार असल्याचे पतंजलीचे सीईओ आचार्य बालकृष्ण यांनी केले आहे.