प्रतिनिधी /बेळगाव
पतंजली योग समितीतर्फे शास्त्रीनगर येथील पाटीदार भवन येथे रविवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती साजरी करण्यात आली. पुरुषोत्तम पाटील, विमला पटेल, संगीता कोनापूरे यांच्या हस्ते यज्ञ करण्यात आला. जोतिबा भादवणकर यांनी पौरोहित्य केले. मगन पटेल व बाबूभाई पटेल यांच्या हस्ते नेताजींच्या फोटोचे पूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना किरण मंडोळकर यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याचा आढावा घेतला. देशभक्तांनी आपले सर्वस्व पणाला लावून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले. मोहन बागेवाडी यांनी आभार मानले.
यावेळी रमेश पाश्चापुरे, ओ. एफ. गावडा, चंद्रकांत खंडागळे, सतीश नाईक, विद्या माने यांच्यासह पतंजली योग समितीचे सदस्य उपस्थित होते.