मी 35 वर्षांची विवाहिता आहे. मला सहा वर्षांचा मुलगा आहे. माझ्या पतीला आमच्या नात्यात खूप असुरक्षित वाटतं. लग्नानंतर त्याने मला संपूर्ण अंग झाकणारे कपडे घालण्याची ताकिद दिली. तो मला इतर पुरुषांशी बोलू देत नाही. त्याने मला नोकरी सोडून मुलाच्या संगोपनासाठी वेळ देण्याचा सल्ला दिला होता. आमच्या लग्नाला आठ वर्षं झाली आहेत. पण त्याच्या वागण्यात काहीच बदल झालेला नाही. माझे ऑफिसमधल्या सहकार्याशी प्रेमसंबंध असल्याचा त्याला संशय आहे. त्याने याच कारणामुळे माझ्या ऑफिसमध्ये येऊन गोंधळ घातला होता. यामुळे मला खूप ओशाळल्यासारखं वाटू लागलं आहे. मी त्याला याबाबत बरेचदा समजावलं आहे. मात्र तो अजिबात ऐकत नाही. हा संशयी स्वभाव सोडला तर माणूस आणि बाप म्हणून तो खूप चांगला आहे.
मी काय करू?
– काही कारणांमुळे तुझ्या पतीला अशी असुरक्षितता वाटू शकते. या लोकांना स्वतःबद्दलच असुरक्षितता वाटते. त्यामुळे ते इतरांशीही असंच वागतात किंवा त्यांची जडणघडण असुरक्षित वातावरणात झालेली असू शकते. हा प्रश्न सोडवण्यासाठी त्याच्या मुळावरच घाव घालायला हवा. तू पतीशी धीराने संवाद साध. संयमाने आणि शांतपणे सगळी परिस्थिती समजावून सांग. तुझं त्याच्यावर प्रेम असल्याची जाणीव करून दे. त्याला दुखावणारी कोणतीही कृती तुझ्याकडून घडणार नाही, याची शाश्वती दे. त्याच्या अशा वागण्यामुळे तुमच्या नात्यात वितुष्ट येईल, याची कल्पना दे. गरज वाटल्यास तू समुपदेशकांची मदत घेऊ शकतेस.