प्रतिनिधी/इचलकरंजी
घरखर्चाला पैसे देत नसल्याच्या कारणातून झालेल्या वादातून पत्नीच्या डोकीत जॅक घालून खून केल्याप्रकरणी पतीला जिल्हा न्यायाधीशांनी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. सद्दामहुसेन बाळू मकुभाई (वय २६, रा. रुई, ता. हातकणंगले) असे आरोपीचे नाव आहे. तर पत्नी परवीन सद्दामहुसेन मकुभाई असे मयत पत्नीचे नाव आहे.
याप्रकरणी एकूण १३ जणांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आहेत. या गुन्ह्याचा तपास हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आर. के. रानगर यांनी करून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. सरकारी वकील व्ही. जी. सरदेसाई यांनी काम पाहिले.