सोनगाव येथे दारूच्या नशेत मारहाण, मद्यपीला अटक
वार्ताहर / कुडाळ
मद्यधुंद पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून आईलाही काठीने बेदम मारहाण केली असल्याची घटना जावळी तालुक्यातल्या सोनगाव येथे घडली. याप्रकरणी आरोपी विनोद बबन शिंदे (वय 38 रा. सोनगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नी आणि आईला मारहाण व जखमी केल्याप्रकरणी कुडाळ पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घरातील टीव्हीचा आवाज पत्नीने कमी करण्यास सांगितले म्हणून रागात आलेल्या मद्यधुंद पती विनोद शिंदे याने दाराच्या जवळील असणारा दगड उचलून थेट पत्नीच्या डोक्यात घातला हा सर्व प्रकार सुरू असतानाच मध्यस्थी करणाऱया जन्मदात्या आईला देखील घरात असणाऱया काठीने बेदम मारहाण करून जखमी केले.
हा धक्कादायक प्रकार बुधवारी सोनगाव येथे घडला असून या संदर्भात पत्नी सौ. पल्लवी विनोद शिंदे (वय 30) यांनी पती विनोद शिंदे याच्या विरोधात कुडाळ पोलीस स्थानकामध्ये तक्रार दिल्यानंतर झालेला प्रकार सांगितला आहे. यावरून कुडाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मद्यधुंद अवस्थेत पती विनोदने शिंदेने पत्नी आणि आईला दगड व काठीने मारहाण करुन जखमी केले पत्नी पल्लवी शिंदे यांच्या डोक्याला जखम झाली आहे. तर आईच्या अंगावर काठीचे वळ मोठय़ा प्रमाणात काठीचे वळ मोठय़ा प्रमाणात उठले आहेत. या सर्व प्रकारामुळे जावळी तालुक्यातील दारूबंदी चव्हाटय़ावर आली आहे. जावळी तालुक्यातल्या अनेक घरात असे रोज रात्री दिवसा मद्यधुंद अवस्थेत धिंगाणे सुरू असतात. अधिक तपास कुडाळ पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक कदम करत आहेत.