18 महिलांच्या हत्येचा आरोप असलेल्या सीरियल किलरला अटक
हैदराबाद / वृत्तसंस्था
कुख्यात सीरियल किलर मैना रामुलू याला हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस आयुक्त अंजनी कुमार यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत या सायको किलरला अटक केल्याची माहिती दिली. मैना रामुलूवर 18 महिलांच्या हत्या केल्याचा आरोप आहे. मैना रामुलू याची पत्नी एका दुसऱया व्यक्तीसोबत पळून गेल्यापासून तो अन्य महिलांना ‘लक्ष्य’ करत होता अशी माहिती तपासातून पुढे आली आहे.
मूळचा संगारेड्डी जिह्यातील रहिवासी असलेला मैना रामुलू याला आतापर्यंत बऱयाचवेळा अटक झाली असून एकदा दोषीही ठरवण्यात आले. त्यानंतर त्याची रवानगी तुरुंगात झाली होती. दोन वर्षांपूर्वी त्याची तुरुंगातून सुटका झाली होती. यानंतरही त्याने हत्यांचे सत्र सुरुच ठेवले. आरोपी मैनाने घाटकेसर आणि मुदगुल पोलीस स्थानक भागात दोन महिलांची हत्या केली. या हत्यांप्रकरणी पोलीस त्याचा शोध घेत होती. अखेर त्याला आता पुन्हा अटक करण्यात यश आले आहे.
परपुरुषासोबत पत्नी फरार
आरोपी मैना रामुलू याची पत्नी परपुरुषासोबत पळून गेली होती. तेव्हापासून त्याचे मानसिक संतुलन बिघडले. 2011 मध्ये त्याला मनोरुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. मात्र तिथून फरार झाल्यापासून तो सीरियल किलर बनला होता. 2013 मध्ये त्याला अटक झाली होती. पाच वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर 2018 मध्ये त्याची सुटका झाली होती. त्यानंतरही त्याने हत्यांचे सत्र सुरूच ठेवले होते. एकटय़ा-दुकटय़ा महिलांची हत्या करून त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू चोरून तो फरार होत असल्याचे तपासातून निष्पन्न झाले होते.