संशयितांमध्ये सेना पदाधिकाऱयासह 2 महिलांचा समावेश
प्रतिनिधी / रत्नागिरी
शहरातील गोखले नाका येथे पत्नीचा गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सेना पदाधिकाऱयासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आह़े सुकांत गजानन सावंत (मिऱयाबंदर, रत्नागिरी), निधा वायंगणकर व भक्ती शिंदे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आह़े
या प्रकरणी सुकांत उर्फ भाई सावंत याची पत्नी स्वप्नाली हिने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होत़ी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नाली व तिचा पती सुकांत यांच्यात गेल्या काही वर्षापासून वाद सुरू आह़े स्वप्नाली हिचे शहरातील गोखले नाका येथे सलोनी नावाचे ब्युटी पार्लर आह़े या पार्लरवरून स्वप्नाली व सुकांत यांच्यात वाद उफाळून आला. सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास स्वप्नाली गोखले नाका येथील पार्लरमध्ये असताना सुकांत सावंत, निधा वायंगणकर व भक्ती शिंदे हे त्या ठिकाणी आल़े यावेळी झालेल्या वादातून सुकांत सावंत याने लाथा-बुक्क्याने मारहाण केल़ी तसेच यावेळी निधा व भक्ती यांनी केस ओढून हातावर, पाठीवर नखे लावल़ी यावेळी सुकांत याने आपला गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार स्वप्नाली हिने शहर पोलिसांत दाखल केली आह़े आपल्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून गाडी व रूमची चावी जबरदस्तीने नेल्याचे स्वप्नाली हिने तक्रारीमध्ये म्हटले आह़े या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपींविरूद्ध भादंवि कलम 307 नुसार गुन्हा दाखल केला आह़े पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत़