वृत्तसंस्था/ गाजीपूर
उत्तर प्रदेशातील गाजीपूर जिल्हय़ातील पोलीस हेडकॉन्स्टेबल मुन्सीसिंग यादव याने आपल्या पत्नीची हत्या करून तसेच दोन मुलांना जखमी करून रेल्वे खाली आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून हा प्रकार घरगुती वादातून घडला असण्याची शक्यता आहे. यादव याने आपली पत्नी विशा हिच्यावर चाकूने वार करून प्रथम तिचा जीव घेतला. नंतर आपली मुले कृष्णा आणि शाम तसेच मुलगी सुधा यांच्यावरही वार केला. त्यानंतर त्याने जवळच्या रुळावर जाऊन रेल्वे खाली आत्महत्या केली. मुलांवर उपचार सुरू असून ती गंभीर जखमी झाले आहेत, असे सांगण्यात आले.