ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
निवडणुकीच्या धक्क्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना आता कौटुंबिक धक्का बसण्याची शक्यता आहे. मेलानिया आता डोनाल्ड यांच्यापासून घटस्फोट घेणार असल्याचे वृत्त मलेनिया यांची मैत्रीण स्टेफनी वोल्कॉफनच्या हवाल्याने तेथील स्थानिक वृत्तपत्राने दिले आहे.
‘डेली मेल’च्या वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या खोल्यांमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांच्यात सध्या घटस्फोटाबद्दल चर्चा सुरू आहे. मेलानिया यांनी मुलगा बॅरेनचा ताबा आणि संपत्तीत अर्धा वाटा मागितला आहे. त्यामुळे ट्रम्प आणि मेलानिया यांचे 15 वर्षांचे नाते आता संपुष्टात येऊ शकते.
ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असताना घटस्फोटाचा निर्णय घेतल्यास ते आपल्या अधिकारांचा गैरउपयोग करुन आपल्याला त्रास देतील, अशी भीती मेलानिया यांना होती. बायडेन यांच्याकडून पराभव झाल्यानंतर तात्काळ घटस्फोट घेण्याचे मेलानिया यांनी आधीच ठरवले होते.