प्रतिनिधी / बेळगाव
मानवतेपेक्षा काहीच मोठे नसते हे बेळगावच्या पत्रकाराने दाखवून दिले आहे. रुग्णवाहिका चालविण्यासाठी चालक उपलब्ध नसल्याने अखेर पत्रकारानेच बेळगाव ते सावंतवाडी अशी रुग्णवाहिका चालवून एका रुग्णाला जीवदान दिले आहे.
टीव्ही 9 या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी विश्वनाथ येळ्ळूरकर यांनी रुग्णवाहिका चालवून आपली सामाजिक जबाबदारी जपली. एका रुग्णाला शिवसेनेच्या रुग्णवाहिकेतून त्यांनी सावंतवाडीपर्यंत नेवून सोडले. सध्या कोरोनाची स्थिती असल्यामुळे रुग्णवाहिका उपलब्ध असली तरी चालक मिळत नसल्याने समस्या येत आहेत. हे लक्षात येताच येळ्ळूरकर यांनी स्वतः रुग्णवाहिका हातात घेऊन त्या रुग्णाला सुखरूप पोहोचविले आहे.