मंत्री विश्वजीत कदम यांनी ठोस भूमिका घ्यावी, पृथ्वीराज देशमुख व संग्रामसिंह देशमुख यांचा पत्रकार संघटनेस पाठिंबा
कडेगाव/प्रतिनिधी
कडेगाव तालुक्यातील पत्रकार सुरज जगताप यांना वाळू तस्करांनी मारहाण केली याच्या निषेधार्थ कडेगाव बंदचे आवाहन केले होते. पत्रकारांच्या आव्हानास कडेगाव शहरातील सर्व व्यापारी व राजकीय नेते यांनी पाठिंबा दिला असून कडेगाव शहरासह, कडेपूर, वांगी, देवराष्ट्रे, नेवरी या गावात कडकडीत शंभर टक्के बंद पाळण्यात आला.
दरम्यान, कडेगाव शहर बंदला पाठिंबा देण्यासाठी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष माणिकराव देशमुख नाना, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजाराम गरूड, श्रमिक मुक्ती दलाचे राज्य निमंत्रण मोहनराव यादव, बसपाचे शिवलिंग सोनवणे, आरपीआयचे जीवन करकटे, भाजपचे संतोष डांगे, प्रकाश गढळे, नगरसेवक विजय शिंदे, विजय रूपनर, राष्ट्रवादी प्रदिप करडे, मेडिकल असोसिएशन अभिमन्यू वरूडे उपस्थित होते.