मालवण/प्रतिनिधी-
आमदार वैभव नाईक यांच्या वतीने मालवण पत्रकार समिती कक्षास सोमवारी संगणक संच भेट देण्यात आला.मालवण पत्रकार समितीच्या मागणीनुसार मालवण नगरपरिषदेच्या वतीने साईल पॅलेस इमारत येथे दोन वर्षांपूर्वी पत्रकार समितीस स्वतंत्रपणे कक्ष दिला.या कक्षास आपल्या वतीने संगणक देऊ असे आमदार वैभव नाईक यांनी वर्षभरापूर्वी जाहीर केले होते. त्यानुसार संगणक संच नुकताच भेट देण्यात आला.
जिल्हा पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य विद्याधर केनवडेकर व मालवण पत्रकार समितीचे सचिव कृष्णा ढोलम यांच्याकडे हा संच सुपूर्द करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, बांधकाम सभापती मंदार केणी, गणेश कुडाळकर, नगरसेवक दीपक पाटकर, भाई कासवकर, बाळू नाटेकर यासह जेष्ठ पत्रकार राजा खांडाळेकर, मनोज चव्हाण, अमित खोत, प्रशांत हिंदळेकर, सिद्धेश आचरेकर, महेश कदम, संग्राम कासले, यासह अन्य पत्रकार उपस्थित होते.