दिल्ली :
राष्ट्रीय श्रमिक पत्रकार संघटनेच्या पत्रकार भारती च्या ग्लोबल सचिव पदी मनीषा उपाध्ये यांची निवड झाली आहे. मूळच्या बेळगावच्या रहिवाशी असलेल्या मनीषा उपाध्ये या गेली वीस वर्षांपासून नवी दिल्लीत टी. व्ही . पत्रकारिता क्षेत्रात आघाडीवर आहेत. त्यांनी आता पर्यंत निवेदिका,इंडिया टी व्ही,न्यूज वर्ल्ड इंडिया, ई टी व्हीं चॅनलस वर काम केले आहे.तसेच त्या आशिया खंडातील वरिष्ठ कार्यकारी निर्माती या पदावर काम करणाऱ्या पहिल्या महिला आहेत. निर्माती व दिग्दर्शक म्हणून त्यांनी बरेच टी.व्ही .शो केले आहेत. अटल बिहारी वाजपेयी अवॉर्ड,मीडिया रतन,स्वामी विवेकानंद युथ आयकॉन अवॉर्ड सारख्या पुरस्कारानी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. या निवडीबाबत त्या म्हणाल्या पत्रकार भारती ट्रेड युनियन असून ते पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य , सुरक्षा व सामाजिक प्रश्नासाठी लढा देत आहे. या संघटनेला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रस्थापित करण्याची जबाबदारी ग्लोबल सचिव म्हणून त्यांना दिली आहे. विविध राज्यात अध्यक्ष,उपाध्यक्ष,सचिव निवड करण्याबरोबरच अनेक श्रमिक संघटनांशी सलग्न राहून कार्य करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपिवली आहे.