प्रतिनिधी/ बेळगाव
मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त पत्रकार दिन साजरा केला जातो. या पत्रकार दिनाचे आयोजन पत्रकार विकास अकादमीच्यावतीने बुधवार दि. 6 रोजी सकाळी 9 वाजता नेहरुनगर येथील कार्यालयात करण्यात आले आहे.
यावेळी मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन होणार आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार सर्जू काटकर, पत्रकार दिलीप कुरुंदवाडे (टीव्ही चॅनेल) यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी सर्व सभासदांनी तसेच पत्रकारांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पत्रकार विकास अकादमीचे अध्यक्ष प्रसाद सु. प्रभू यांनी केले आहे.