सारंग राघोचे मालिकावीर व सामनावीर, हेस्कॉम इलेव्हन संघाला उपविजेतेपद
क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
सारंग राघोचेची आक्रमक फलंदाजी आणि उत्कृष्ट सांघिक गोलंदाजीच्या जोरावर पत्रकार इलेव्हनने हेस्कॉम इलेव्हनचा 5 गडय़ानी पराभव करून साईराज चषक पटकाविला. सारंग राघोचे मालिकावीर व सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
व्हॅक्सीन डेपो मैदानावर पहिल्या उपांत्य सामन्यात फौंड्री क्लस्टर संघाने 8 षटकात 2 बाद 85 धावा केल्या. त्यात राहुलने 30 तर प्रवीणने 25 धावा केल्या. पत्रकारतर्फे गोपाळ व चंद्रकांत यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल पत्रकार संघाने 7.3 षटकात 3 बाद 86 धावा जमवित 7 गडय़ांनी विजय मिळविला. सारंग राघोचेने 39 तर विनायक पाटीलने 31 धावा केल्या. फौंड्रीतर्फे संकेत व शिवम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
दुसऱया उपांत्य सामन्यात टिळकवाडी पोलीस स्थानक संघाने 8 षटकात 8 बाद 46 धावा केल्या. त्यात तिप्पण्णा व सय्यद यांनी प्रत्येकी 11 धावा केल्या. हेस्कॉमतर्फे रघु, संतोष, सिद्धू, व शुभम यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल हेस्कॉमने 5 बाद 47 धावा जमवित 8 गडय़ांनी विजय मिळविला. अमरने 17 तर संतोषने 14 धावा केल्या.
अंतिम सामन्यात हेस्कॉमने 9 षटकात सर्व बाद 74 धावा केल्या. त्यात अमर सरदेसाईने 2 चौकारासह 25 तर शुभमने 1 षटकार, 2 चौकारासह 16 धावा केल्या. पत्रकारतर्फे कर्णधार गोपाळ गावडा (15 धावात 4 बळी) चंद्रकांत पाटील (3-14) यांनी भेदक मारा केला. प्रत्युत्तरादाखल पत्रकार संघाने 9.4 षटकात 5 बाद 75 धावा जमवित जेतेपद पटकावले. 4 बाद 8 अशी बिकट स्थिती असताना गोपाळ गावडा व सारंग राघोचे या जोडीने 5 व्या गडय़ासाठी 61 धावांची भागीदारी करीत डाव सावरत संघाला विजयासमीप आणले. सारंग राघोचे 3 षटकार, 4 चौकारासह 21 चेंडूत 44 धावांवर बाद झाला. गोपाळ गावडा-महेश काशीद यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. हेस्कॉमतर्पे रघुने 9 धावात 3 तर शुभम व सदा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रमुख पाहुणे हेस्कॉमचे प्रमुख अभियंते विनोद कुरेर, दीपक धनपाल, सेक्शन ऑफिसर प्रवीण बरगाली, जगदीश मोहिते, साहाय्यक अभियंते विशाल मिरजी, दोपण्णा, महेश फगरे, विनायक धामणेकर, विनायक नाईक, उत्तम शिंदे, गजानन फगरे, आनंद चव्हाण आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या पत्रकार व उपविजेत्या हेस्कॉम संघाला चषक देऊन गौरविण्यात आले. फायनल सामनावीर सारंग राघोचे, उत्कृष्ट फलंदाज अमर सरदेसाई, उत्कृष्ट गोलंदाज सदा, मालिकावीर सारंग राघेचे यांना गौरविण्यात आले.
एसपीएम रोड, प्रेन्ड्स इलेव्हन संघांची विजयी सलामी
साईराज स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित सातव्या साईराज चषक निमंत्रितांच्या आंतररराज्य क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात प्रेन्ड्स इलेव्हनने सेव्हन स्टार संघाचा तर एसपीएम रोड संघाने ऍडव्होकेट संघाचा पराभव करून विजयी सालामी दिली.
व्हॅक्सीन डेपो मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात सेव्हन स्टार संघाने 8 षटकात 8 बाद 56 धावा केल्या. त्यात नजिमने 20 धावा केल्या. प्रेन्ड्सतर्फे मोहिदने 2 धावात 4 तर लक्ष्मीकांतने 17 धावात 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल प्रेन्ड्स इलेव्हनर्पे 5 षटकात बिनबाद 57 धावा जमवित 10 गडय़ांनी एकतर्फी विजय मिळविला. मोहिदने 2 षटकार, 2 चौकारासह 27 तर रोहितने 1 षटकार, 2 चौकारासह 18 धावा केल्या.
दुसऱया सामन्यात ऍडव्होकेट संघाने 8 षटकात 7 बाद 67 धावा केल्या. त्यात सुनिल सक्रीने 1 षटकार, 1 चौकारासह 31 तर अमितने 13 धावा केल्या. एसपीएमतर्फे अभिने 3 तर अभिजितने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल एसपीएम रोडने 6.2 षटकात 4 बाद 68 धावा करून सामना 6 गडय़ांनी जिंकला. त्यात महावीरने 3 षटकार, 3 चौकारासह 36 तर अक्षयने 10 धावा केल्या. ऍडव्होकेटतर्फे शिवाजीने 1 गडी बाद केला.
गुरूवारचे सामने
1) हिंदवी स्पोर्ट्स कल्लेहोळ, वि. एमसीसी मच्छे, सकाळी 9 वा. 2) आरएस स्पोर्ट्स वि. आरके स्पोर्ट्स, स. 10.30 वा., 3) एमडी स्पोर्ट्स वि. जगदंब हंगरगा, दु. 12 वा., 4) साईराज बी वि. बालाजी स्पोर्ट्स, दु. 1.30 वा. 5) सिद्धी स्पोर्ट्स वि. फोरमॅक्स एक्स्पोर्ट, दु. 3 वाजता.