पेडणेतील सरकारी यंत्रणेचा पूर्णपणे दुर्लक्ष : संबंधित अधिकाऱयांच्या आशीर्वादानेच खुलेआम सुरू?
प्रतिनिधी /पेडणे
पत्रादेवी तोरसे येथील माळरानावर पंधरा बेकायदा चिरेखाणी सुरू आहेत. याकडे सरकारी यंत्रणेचा पूर्णपणे दुर्लक्ष त्या संबंधित अधिकाऱयांच्या आशीर्वादाने या खाणी सुरू असल्याची चर्चा आहे.
अलिकडेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बेकायदा चिरेखाणी रेती व्यवसायावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी खास भरारी पथकही स्थापन केले आहे. मात्र पेडणे तालुक्मयातील पत्रादेवी तोरसे येथील हा प्रकार पाहिल्यास सरकारी अधिकाऱयांच्या आशीर्वादाने पत्रादेवी पोलीस चेक पोस्ट नजीक माळरान भागात या 15 बेकायदा चिरे उत्खनन सुरू आहेत. मात्र या प्रकाराकडे सरकारी यंत्रणेचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे स्पष्ट होत आहे.
पेडणे तालुक्मयातील विविध प्रकारचे बेकायदेशीर व्यवसाय सुरू असून अधिकरीच अशा बेकायदा व्यवसायाला खतपाणी घालत असल्याचे चित्र आहे. अधिकाऱयांच्या हाताखालील कर्मचारी अशा व्यावसायिकांकडून महिन्याला ठराविक रक्कम हप्त्याच्या स्वरुपात गोळा करून आपल्या वरि÷ आधिकाऱयांकडे देत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान, स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांनी बेकायदा व्यवसायावर आळा घालावा, अशी मागणी लोकांमधून होत आहे.
राज्यात काही भागात बेकायदा व्यवसायांवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारतर्फे भरारी पथकाची स्थापना केली आहे. या पथकामार्फत अनेक तालुक्मयात बेकायदा सुरु असलेल्या चिरेखणीवर छापा मारून या बेकायदा चिरेखणी बंद पाडल्या आहेत. मात्र पेडणे मतदारसंघात पत्रादेवी येथे मोठय़ा प्रमाणात बेकायदेशीर चिरेखाणी सुरू आहेत. यावर संबंधित अधिकाऱयांनी कारवाई करून तत्काळ बंद पाडाव्यात, अशी मागणीही लोकांमधून केली जात आहे.