शाहुवाडी प्रतिनिधी
आंब्या पासून केवळ दोन कि.मी.अंतरावर असणा-या मानोली ता.शाहूवाडी येथील धरणाच्या मागील बाजूस असणाऱ्या नायकाचा सरवा नावाच्या जंगलव्याप्त भागात पत्र्याच्या पेटीत अनोळखी सुमारे ३५ वर्षीय महिलेचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. गुराखी लोकांना आढळून आला. दरम्यान घटनास्थळी वरीष्ठ पोलीस अधिकारी यांनी भेट देवून घटनेची अधिक माहीती घेऊन तपासाबाबत अधिक सूचना दिल्या
मानोलीचे पोलीस पाटील दत्ता गोमाडे यांनी शाहूवाडी पोलीसात फिर्याद दिली आहे. पो.नि. विजय पाटील यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी भेट देऊन या घटनेचा पंचनामा करून पेटीसह मृतदेह ताब्यात घेतला. व मलकापूर ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या महिलेचा खून गळा आवळून केला असावा. असा प्राथमिक अंदाज शाहूवाडी पोलिसातून वर्तवण्यात आला आहे. मृत महिलेचे वर्णन असे-रंग गोरा, अंगात काळ्या रंगाची अर्धवट साडी होती.सहा ते सात दिवसांपूर्वी खून झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे