प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरात स्वच्छता कोठे दिसत नाही. फक्त स्वच्छतेच्या नावाखाली सगळी लुटालुट सुरु आहे. शहराची पाहणी करायला आलेले पथक गेल्या तीन दिवसांपासून साताऱयात डेरेदाखल झाले आहे. मात्र, या पथकाबाबत सत्तेतल्या नगरसेवकांनाही काहीच माहिती नाही. मात्र, आरोग्य विभागाने पथकाची चांगलीच बडदास्त ठेवण्यात आली आहे. पथकाच्या डोळय़ात धुळ फेकण्यासाठी एअरपोर्ट टॉयलेटच्यासमोर तात्पुरत्या कुंडय़ा, आरसे ठेवण्याची लगबग आरोग्य कर्मचाऱयांची दिसत होती. तर पाठीमागे हे पथक गाडीतून दाखल होत होते. हॉटेलमध्ये पथकाला चांगलीच रंगीत संगीत मेजवाणी दिल्याची चर्चा साताऱयात सुरु होती.
स्वच्छ भारत सर्व्हेक्षणमध्ये 2016 मध्ये सातारा शहर देशात पहिल्या वीसमध्ये आले होते. त्यानंतर जे पिछाडीवर पडत गेले ते अद्यापही. स्वच्छ भारत अभियानाचा सर्व्हे करण्यासाठी साताऱयात तीन दिवसांपासून पथक आले आहे. या पथकाची कसलीही माहिती ज्या प्रभागात पाहणी करायला हे पथक जाणार होते तेथील नगरसेवकांना माहिती नाही. दरम्यान, शहरात जी जी टॉयलेट चांगली आहेत. त्या त्या टॉयलेटमध्येच आणखीच पथकाच्या अगोदर पोहचून तेथे कुंडय़ा लावून आरसे लावून शौचालय कसे साताऱयातील आहे ते दाखवण्याचा केवीलवाणा प्रयत्न सुरु आहे. दरम्यान, आज रविवारी चिमणपूरा पेठेतील अगोदरच चांगली असलेली शौचालये दाखवण्याचा प्रकार सुरु होता. पथक पोहचण्याच्या आतच पालिकेचा टीपर कुंडय़ा घेवून पोहचत होता. तेथे टापटीपपणा दाखवण्याचा प्रयत्न केला जात होता.
पथकातील अधिकाऱयांची चांदी
साताऱयात प्रत्यक्षात आरोग्य विभागाचे स्वच्छ भारत अभियानाच्या अनुषंगाने केवळ बॅनरबाजी झालेली आहे. इतर काम शुन्य झाले आहे. त्याचाच प्रत्यय वारंवार येतो आहे. आताही आलेल्या पथकातील अधिकाऱयांची मात्र चांदी सुरु आहे. हॉटेलमध्ये जेवणावळी अन् फिरायला गाडी अशी जोरदार चर्चा रंगत आहे.
एअरपोर्ट टॉयलेटचा रॅम्प मेजदार
सार्वजनिक स्वच्छतागृहाला शहरातील सर्वच नागरिक वापर करत असतात. अपंगंनाही वापरता यावे यासाठी रँम्प करण्यात आला आहे. हा रॅम्प पाहून शौचालयास आलेला अपंग येईल कसा आणि तेथून खाली जाईल कसा हाच विचार त्या अपंगास पडत असेल. रॅम्प बांधले गेले परंतु ते तीव्र उताराचे. त्यांना बाजूने संरक्षण पाईप नाही. त्यामुळे मेजदार रॅम्प आहेत.