एपीएमसी रोडवरील वीजवाहिन्या नागरिकांसाठी ठरताहेत धोकादायक
प्रतिनिधी/ बेळगाव
शहरवासियांच्या सुविधेसाठी प्रत्येक रस्त्यावर पथदीप बसविण्यात आले आहेत. मात्र निम्मे पथदीप बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. तर पथदीपांच्या व विद्युत वाहिन्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने पथदीपांजवळ असलेल्या विद्युत वाहिन्या नागरिकांसाठी धोकादायक बनल्या आहेत. ठिकठिकाणी उघडय़ावर सोडण्यात आलेल्या विद्युत वाहिन्या नागरिकांसाठी जीवघेण्या बनल्या आहे.
पथदीप सुरू करण्याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. मात्र धोकादायक विद्युतवाहिन्यांची दुरुस्ती करण्याकडे देखील कंत्राटदाराने कानाडोळा केला आहे. त्यामुळे भटकणाऱया जनावरांना आणि नागरिकांना उघडय़ावर असलेल्या विद्युतवाहिन्या जीवघेण्या बनल्या आहेत. या ठिकाणी अनर्थ घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. ठिकठिकाणी स्वीच बोर्डच्या पेटय़ांचे दरवाजे गायब आहेत. तर पथदीपांच्या विद्युतवाहिन्या खराब झाल्याने दुसऱया वाहिन्या लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्युतवाहिन्या जोडलेल्या ठिकाणी व्यवस्थित टेप लावणे आवश्यक आहे. पण याबाबत कंत्राटदार दुर्लक्ष करीत आहे. एपीएमसी रोडवर असलेल्या विद्युत पथदीपांच्या विद्युत वाहिन्या लोंबकळण्याच्या अवस्थेत आहेत. पथदीपाच्या खांबाखाली विद्युत वाहिन्या उघडय़ावर असल्याने धोका निर्माण झाला आहे. दुभाजकावर असलेल्या विद्युत खांबाजवळ गवत उगवले आहे. त्यामुळे उघडय़ा असलेल्या धोकादायक विद्युतवाहिन्या निदर्शनास येत नाहीत. चुकून रस्ता ओलांडणाऱया नागरिकांनी याठिकाणी पाय ठेवल्यास विजेचा धक्का बसण्याची शक्मयता आहे. तसेच गवत खाण्यासाठी भटकी जनावरे फिरत असतात. गवत खाताना जनावरांना देखील विजेचा धक्का बसण्याची शक्मयता आहे. अशाप्रकारे असंख्य ठिकाणी विद्युतवाहिन्या उघडय़ावर आहेत. याची देखभाल करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱयांची आणि कंत्राटदाराची आहे. पण अधिकारी व कंत्राटदारांनी पथदीपांच्या देखभालीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. पथदीपांअभावी अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. तसेच आता पथदीपांचा धोका देखील नागरिकांना निर्माण झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी अनर्थ घडल्यानंतरच मनपाच्या अधिकाऱयांना जाग येणार का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. उघडय़ावर असलेले फ्यूज बॉक्स आणि लोंबकळणारे धोकादायक विद्युत वाहिन्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.