रुग्ण सेवा प्रकल्पचा उपक्रम, नियम पाळण्याचे नागरिकांना आवाहन
प्रतिनिधी / मिरज
येथील रुग्ण सेवा प्रकल्पच्या वतीने कोरोना आणि ओमिक्रॉन बाबत जनजागृतीसाठी पथनाटय़ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. शहरातील विविध प्रमुख चौकांमध्ये काही तरुण-तरुणी पथनाट्य़ाद्वारे कोरोना आणि ओमिक्रॉन पासून स्वतचे संरक्षण करण्यासाठी शासनाच्या नियमावलीचे पालन करण्यासह लसीकरणास प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे. या पथनाट्य़ांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.