प्रतिनिधी / सांगली
महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत गुरुवारी पदवीधर मतदारसंघ पुणे विभागाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अरुण (अण्णा) लाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.
महत्त्वाच्या अशा मानल्या जाणाऱ्या पुणे पदवीधर मतदारसंघात सुशिक्षित आणि कार्यतत्पर उमेदवार देणे गरजेचे होते. क्रांती समूहाच्या माध्यमातून अरूण अण्णा यांनी सामाजिक कार्य केले आहे. त्यामुळे महाविकासआघाडीने त्यांची निवड केली. मला खात्री आहे की, मतदार त्यांच्या बाजूनेच कौल देतील.
यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात राज्यमंत्री सतेज पाटील राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम खासदार वंदना चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, पुणे मनपाचे माजी महापौर अंकुश काकडे आणि महाविकास आघाडीचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.