क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
जॉन व्हेस्ली मेथॉडीस्ट पदवीपूर्व महाविद्यालय आयोजित तालुकास्तरिय ऍथलेटीक्स स्पर्धेत आरपीडी महाविद्यालयाच महिला क्रीडा पटुंनी 37 गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले तर ऐश्वर्या नेसरकर हिने वैयक्तिक विजेतेपद पटकाविले आहे.
सदर स्पर्धेत शुभांगी काकतकर हिने 3000 मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक 1500 धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक तर 800 मीटर धावण्याच्या स्पर्धेत तृतिय क्रमांक व क्रॉसकंट्री स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला. तर मनाली देवण हिने 110 मि. अडथळा शर्यतीत द्वितीय क्रमांक पटकाविला. कु. ऐश्वर्या नेसरकरने लांब ऊडीत प्रथम, तिहेर उडीत प्रथम, तर उंच उडीत प्रथम क्रमांक पटकावित 15 गुणांसह वैयक्तिक विजेतेपद पटकाविले. वैष्णवी बुदुक हिने तिहेरी उडीत द्वितीय तर 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत तृतिय व 400 मी. अडथळा शर्यतीत द्वितीय क्रमांक पटकाविला. टीना वानखडे हिने 3000 हजार मि. वॉक स्पर्धेत प्रथम, 400 मी. अडथळा शर्यतीत तृतिय, नकोशा मंगनाकर हिने 3000 मी धावण्याच्या शर्यतीत द्वितीय, 1500 मी. धावण्याच्या शर्यतीत तृतीय तर क्रॉस कंट्री स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला. सोनिया हेळवेने 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम 200 मी. धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. 4ƒ100 मी रिले स्पर्धेत ऐश्वर्या नेसरकर, वैष्णवी बुद्रुक, मनाली देवण, सोनिया हेळवे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. 4ƒ400 शुभांगी काकतकर वैष्णवी बुद्रुक, नकोशा मंगनाकर, टीना वानखडे यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. त्याचप्रमाणे कब्बड्डी, थ्रोबॉल संघांनी उपविजेतेपद पटकाविले. गोळाफेकमध्ये आनंद हुंदरेने प्रथम क्रमांक, प्रथम याने 110 मी. अडथळा शर्यतीत प्रथम व 200 मी धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. तर नकोश जाधव हिने बुद्धीबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. या सर्वांना एसकेई संस्थेचे संस्थापक मंडळा, प्राचार्य के. बी. मेळेद, क्रिडा निर्देशक देवेंद्र कुडची यांचे मार्गदर्शन लाभत आहे.