साहित्य : कोफ्ताः 200 ग्रॅम पनीर खिसून, 2 वाफवलेले बटाटे मॅश करून, 1 हिरवी मिरची चिरून, अर्धा चमचा आलं खिसून, अर्धा चमचा लिंबूरस, 2 चमचे कोथिंबीर चिरून, दीड चमचा कॉर्नफ्लोर, 8 काजू तुकडे, मीठ, तेल तळण्यासाठी, ग्रेव्हीः 3 टोमॅटो प्युरी, 2 चमचे काजू 10 मिनिटे पाण्यात भिजवून, 2 चमचे आलं-लसूण पेस्ट, 1 हिरवी मिरची चिरून, 1 कांदा चिरून, अर्धा चमचा जिरं, 2 लवंग, अर्धा इंच दालचिनी तुकडा, पाव चमचा हळदपूड, अर्धा चमचा लाल तिखट पावडर, पाव चमचा गरम मसाला पावडर, दीड चमचा धणेपूड, अर्धा चमचा साखर, अर्धा चमचा कसूरीमेथी, 2 चमचे तेल, मीठ
कृती : बाऊलमध्ये कोफ्ताचे साहित्य मिक्स करावे. हाताला तेल लावून त्याचे छोटे गोळे बनवावेत. त्याच्या मधे काजू चिकटवून गरम तेलात सोनेरी रंगावर तळावेत. ग्रेव्हीसाठी काजू पेस्ट बनवावी. गरम तेलात जिरं टाकावे. नंतर लवंग आणि दालचिनी टाकावी. आलं-लसूण टाकावे. नंतर कांदा सोनेरी रंगावर परतवून टोमॅटो प्युरी मिक्स करावी. नंतर काजू पेस्ट, हळदपूड, लाल तिखटपूड, धणेपूड, गरम मसाला पावडर, साखर आणि मीठ टाकून परतवावे. नंतर कसूरीमेथी आणि पाव वाटी पाणी ओतून ग्रेव्ही तयार करावी. शेवटी तळलेले पनीर मिक्स करून आच बंद करावी. तयार पनीर नान अथवा भातासोबत द्या.