साहित्यः मसाला पेस्टः 1 चमचा बटर, 4 लाल सुकी मिरची, 1 चमचा धणे, 1 चमचा जिरं, पाव चमचा मेथीदाणे, अर्धा चमचा बडीशेप, अर्धा चमचा काळीमिरी, 4 लसूण पाकळय़ा, 2 चमचे चिंचेचा कोळ, पाव वाटी पाणी, रोस्टींगसाठीः 1 चमचा बटर, 15 पनीरचे चौकोनी तुकडे, घी रोस्टसाठीः 2 चमचे बटर, 1 कांदा उभा चिरून, 4 कढीपत्ता पाने, पाव चमचा हळदपूड, 2 चमचे दही, मीठ, अर्धा चमचा गूळ
कृतीः मसाला पेस्टसाठी दिलेले साहित्य गरम बटरमध्ये परतवावे. गार झाले की लसूण टाकून मिक्सरला लावून पेस्ट बनवावी. गरम बटरमध्ये पनीरचे तुकडे हलक्या सोनेरी रंगावर परतवावे. दुसऱया कढईत बटर गरम करून त्यात कांदा टाकून गुलाबी रंगावर परतवावा. नंतर त्यात हळदपूड आणि मिक्सरला लावलेली पेस्ट मिक्स करून दहा मिनिटे परतवावी. आता त्यात दही घालावे. नंतर मीठ आणि गूळ टाकावे. मिश्रण शिजले की त्यात पनीरचे तुकडे मिक्स करून दोन मिनिटे परतवावे. वरून बटरमध्ये परतलेला कढीपत्ता सजवून तयार पनीर घी रोस्ट डोसा अथवा रोटीसोबत खाण्यास द्या.