साहित्य : 8 ते 10 पांढरा अथवा ब्राऊन बेड स्लाईस, 250 ग्रॅम पनीर, 1 हिरवी मिरची बारीक चिरून, अर्धा चमचा आलं खिसून, 1 चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव चमचा लाल तिखट पावडर, पाव चमचा धणेपूड, पाव चमचा गरम मसाला पावडर, अर्धा चमचा चाट मसाला अथवा आमचूर पावडर, चवीपुरते मीठ, बटर अथवा तेल आवश्यकतेनुसार
कृती : सारणासाठी पनीर कुस्करून घ्यावे. त्यात आलं, हिरवी मिरची, धणेपूड आणि कोथिंबीर टाकून मिश्रण मिक्स करावे. नंतर त्यात लाल तिखट पावडर, गरम मसाला पावडर, चाट मसाला आणि मीठ टाकून मिश्रण परत एकदा एकजीव करावे. रोल बनविण्यासाठी बेडच्या कडा आधी काढाव्यात. कापलेल्या कडा मिक्सरला लावून बेडक्रम्स बनवावे. आता चमचाभर पनीरचे सारण बेड स्लाईसवर ठेवून त्याच्या कडा पाण्याने बंद करून बेकिंग ट्रे वर ठेवावे. नंतर बेड रोलला हलक्या हाताने तेल अथवा बटर लावावे. आता ओव्हन 200 डिग्रीवर प्रिहीट करून 10 ते 12 मिनिटे ठेवून रोल सोनेरी रंगावर भाजावेत. आता तयार रोल सॉस अथवा चटणीसोबत द्या.