खडेबाजार पोलिसांची कारवाई : पन्नीच्या 185 पुडय़ांसह 68 हजाराचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी /बेळगाव
सरदार्स मैदानाजवळ पन्नी विकणाऱया दोघा जणांना सोमवारी खडेबाजार पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून पन्नीच्या 185 पुडय़ा जप्त करण्यात आल्या असून गांजा पाठोपाठ पन्नी विकणाऱयांच्याही मुसक्मया आवळण्यात आल्या आहेत.
खडेबाजारचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर, उपनिरीक्षक आर. बी. सौदागर, व्ही. एन. कंठीकर, बी. एन. नवकुडी, एम. एस. हणगंडी, अमरनाथ शेट्टी, बी. एस. रुद्रापूर, मोहन अरळगुंडी, प्रकाश सनमनी आदींनी ही कारवाई केली आहे. अबकारी उपअधीक्षक सी. एस. पाटील हे पंच म्हणून उपस्थित होते.
तौसिफ रियाज निजामी (वय 26, रा. उज्ज्वलनगर), सूरज अजय बनसकर (वय 25, रा. सदाशिवनगर) अशी अटक केलेल्या दोघा जणांची नावे आहेत. त्यांच्याजवळून पन्नीच्या 185 पुडय़ा, 1150 रुपये रोख रक्कम, दोन मोबाईल असा एकूण 68 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
48 ग्रॅम 410 मिली पन्नी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्याच्या लहान पुडय़ा बांधून सरदार्स हायस्कूल मैदानाजवळ विक्री करण्यात येत होती. या जोडगोळीने पन्नी कोठून मागविली याची चौकशी सुरू आहे. यापूर्वीही खडेबाजार पोलिसांनी पन्नी विकणाऱया गुन्हेगारांच्या मुसक्मया आवळल्या होत्या.