पन्हाळा / प्रतिनिधी
प्रतिवर्षी परंपरेनुसार साजरी करण्यात येणारी शिवजयंती ऐतिहासिक पन्हाळगडावर अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली. कोरोनामुळे येथील शिवमंदीरातुन शिवज्योती रवाना झाल्या नाही.अनेक शिवभक्तांनी घरातुनच शिवाजी महाराजांना अभिवादन केले.}
शिवजयंती म्हंटले की जय ..भवानी…जय.शिवाजी…छ.शिवाजी महाराज की जय..या घोषणांनी पन्हाळगड दणाणुन जायचे त्यात हलगीचा कडकडाट,नगाऱ्या गजर असे शिवमय वातावरणात शिवजयंती साजरी होत असे. पण कोरोनाच्या महामारीमुळे अत्यंत साधेपणाने शिवजयंती साजरी करण्यात आली. सकाळी नऊ वाजता येथील शिवमंदीरात मंदीराचे पुजारी हनिफ नगारजी व संचित भाडेकर,दगडु अतिग्रे यांनी शिवजयंती निमित्त शिवाजी महाराजांच्या मुर्तीला दुग्ध अभिषेक घालुन पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
याबरोबर पन्हाळडाच्या पायथ्याशी बुधवारपेठ येथे देखील शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करुन शिवजयंती साजरी करण्यात आली.यावेळी सामाजिक कार्यकर्ते बबन जामदार, ग्रामपंचायत सदस्य जमिर अत्तार आदी उपस्थित होते. याचबरोबर परिसरातील आपटी, ऩेबापुर, पिंपळे तर्फ सातवे, इंजोळे, राक्षी, निकमवाडी, धबधबेवाडी येथे देखील शिवजयंती साधेपणाने साजरी करण्यात आली.