प्रतिनिधी / पन्हाळा
पन्हाळा उपनगराध्यक्षपदी जनसुराज्यशक्ती पक्षाच्या नगरसेविका पल्लवी मंदार नायकवडी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.पीठासन अधिकारी म्हणुन नगराध्यक्षा रुपाली धडेल यांनी काम पाहिले.
शरयु लाड यांनी आपल्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने सदरचे पद रिक्त झाले होते.त्यानुसार आज उपनगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. पन्हाळा नगरपरिषदेवर एकहाती जनसुराज्यशक्ती पक्षाची सत्ता असल्याने निवड बिनविरोध होणार हे जवळ पास निश्चितच होती.पक्षाचे संस्थापक डॉ. विनय कोरे यांनी पल्लवी नायकवडी यांचे नावावर शिक्कामोर्तब केल्याने आज सकाळी उपनगराध्यक्ष पदासाठी नायकवडी यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला.यासाठी सुचक म्हणुन फिरोज मुजावर तर दिनकर भोपळे यांनी अनुमोदक म्हणून सहमती दर्शवली. अर्ज भरण्याच्या मुदतीपर्यंत नायकवडी यांचा एकमेव अर्ज आल्याने तसेच सदरचा अर्ज छाननीत पात्र ठरल्याने बिनविरोध निवडीची औपचारिकताच शिल्लक राहिली होती.
दरम्यान, नगराध्यक्षा रुपाली धडेल यांनी पल्लवी नायकवडी यांची उपनगराध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.यानंतर नगराध्यक्षा धडेल यांच्याहस्ते नुतन उपनगराध्यक्षा चा सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी शरयु लाड, तेजस्विनी गुरुव,रुक्साना मुजावर, यास्मीन मुजावर ,नगरसेवक चैतन्य भोसले, अवधुत भोसले यांच्यासह आजी-माजी नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते. निवडीनंतर फटाक्यांची आतिषबाजी करुन जल्लोष साजरा करण्यात आला. सर्व सदस्यांनी सदरची निवड बिनविरोध केल्याने नूतन उपनगराध्यक्षा पल्लवी नायकवडी यांनी सभागृहाचे आभार मानले.