ऐतिहासिक पन्हाळगडाचे शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
पन्हाळा/प्रतिनिधी
ऐतिहासिक पन्हाळगडाची प्रसिद्ध पर्यटन स्थळ,इतिहासाचा साक्षीदार म्हणुन ख्याती आहेच.पण आज स्वच्छ सर्वेक्षण अभियानात 25 हजाराच्या गटातील नगरपरिषदेत देशात प्रथम क्रमांक मिळाल्याने स्वच्छ पन्हाळा म्हणुन देखील एक वेगळी ओळख देशपातळीवर निर्माण झाली आहे.
केंद्रीय स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या महाराष्ट्रातील निवडक 17 शहराना मानांकन मिळाले होते.त्यात पन्हाळा नगरपरिषदेचा देखील समावेश होता.आज 20 आँगस्ट रोजी 25 हजार लोकसंख्येच्या गटातील नगरपरिषदेत पन्हाळा नगरपरिषदेचा प्रथम क्रमांक केंद्रीय नगरविकास विभागाने जाहीर केले.आज जिल्हाधिकारी कार्यालयात व्हर्च्युअल कार्यक्रमाद्वारे ही घोषणा कऱण्यात आली.या कार्यक्रमासाठी नगराध्यक्षा रुपाली धडेल,मुख्याधिकारी डाँ.कैलास चव्हाण,स्वरुप खारगे उपस्थित होते.नगरपरिषदेस प्रथम क्रमांक मिळाल्याचे जाहीर होताच नगरपरिषदेसमोर फटाक्याची आतीषबाजी करण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष चैतन्य भोसले, रविंद्र धडेल, नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सफाई कर्मचारी यांचा उपनगराध्यक्ष भोसले यांनी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान,यासाठी पन्हाळ्यातील नागरिक,सफाई कर्मचारी,सर्व नगरसेवक,नगरपरिषदेचे कर्मचारी,पत्रकार यांचे मोठे योगदाम लाभल्याचे नगराध्यक्षा रुपाली धडेल यांनी सांगितले.