पन्हाळा / प्रतिनिधी
पन्हाळा तालुक्यातील कोतोली येथील दोन तर पोर्लेतील एका कापड व्यवसायिकवर शासनाचे आदेश डावलून व्यवसाय सुरू केल्याप्रकरणी व्यवसायिकांवर तीस हजार रुपये तर विणा मास्क फिरणाऱ्या पाच जणा कडून दोन हजार पाचशे रुपयांचा असा एकूण 32 हजार 500 रुपये दंड वसूल केला. या कारवाईच्या बडग्याने व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
पन्हाळा तालुक्यातील कोतोली ही मोठी बाजारपेठ आहे. याठीकाणी पश्चिम पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यातील सुमारे 40 हून अधिक खेड्यातील नागरिक खरेदी विक्री साठी मोठ्या प्रमाणात येत असतात. या बाजारपेठेत सुमारे 35 ते 40 बँका ,पतसंस्था, व निधी बँक आहेत. तसेच सर्व होलसेल व रिटेल व्यवसायिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे या ठिकाणी वारंवार प्रशासन व्यापारी वर्गाला सूचना देत आहे.
मात्र काही व्यवसायिक शासनाने लागू केलेल्या नियमांना डावलून व्यवसाय करीत होते . त्यामुळे आज शारदा कापड केंद्र ,पोर्ले .फ्रेंडस अँडस दुकान, ,कोतोली. वैभवराज कापड दुकान ,कोतोली. या व्यावसायिकांना प्रत्येकी दहा हजार रुपये तर वीणा मास्क फिरणाऱ्या पाच जणांना प्रत्येकी पाचशे रुपये दंड आकारण्यात आला . पन्हाळ्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक सतीश होडगर, मंडल अधिकारी सतिष ढेंगे, तलाठी सूर्यवंशी व ग्रामसेवक यांच्या पथकाने ही कारवाई केली.