प्रतिनिधी / बेळगाव
शहर परिसरात यंदाचा दसरा कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत साधेपणाने साजरा करण्यात आला. प्रत्येक देवस्थानच्या पुरोहितांनी आपल्या मंदिरांमध्ये नियमांचे पालन करून साधेपणाने दसरा साजरा केला. उत्सवाची, सीमोल्लंघनाची, रथ फिरविण्याची परंपरा अखंड राहावी यासाठी सर्व विधी मर्यादित स्वरुपात करण्यात आले.
दरवषी दसऱयादिवशी ज्योती कॉलेजच्या मैदानावर नागरिकांच्या लक्षणीय उपस्थितीत दसरा साजरा केला जातो. यंदा सीमोल्लंघनाला प्रशासनाची परवानगी मिळण्याबाबत साशंकता होती. मात्र, शहर देवस्थान मंडळाने प्रशासनाला परंपरेची माहिती देऊन, नियमांचे पालन करण्याचे आश्वासन देऊन परवानगी मिळविली. मात्र मोजक्मयाच व्यक्तींच्या उपस्थितीत सीमोल्लंघन झाले.
चव्हाट गल्लीतील देवदादा सासनकाठी व शहर देवस्थान मंडळातर्फे परंपरेप्रमाणे नंदी फिरविण्यात आला. 11 वा. चव्हाटा मंदिर, मारुती मंदिर येथे पूजा करून सासनकाठी सीमोल्लंघन मैदानावर दाखल झाली. तेथे परंपरेप्रमाणे तलवार पूजन करण्यात आले.
याप्रसंगी आमदार अनिल बेनके, देवस्थान समितीचे अध्यक्ष रणजित चव्हाण-पाटील व अन्य मोजकेच निमंत्रित मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना रणजित चव्हाण-पाटील यांनी, प्रशासनाने दिलेल्या मार्गसूचिनुसार नियमांचे पालन करून उत्सव साजरा करावा लागत आहे. सर्व देवस्थानांचे यासाठी सहकार्य लाभले आहे, याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. जगावर आलेले कोरोनाचे संकट टळू दे यासाठी देवीकडे गाऱहाणे घालण्यात आले.
पुढील वषी भव्य प्रमाणात दसरोत्सव
आमदार अनिल बेनके यांनी, यंदा दसरा आणि सीमोल्लंघन साध्या पद्धतीने साजरा करावा लागला आहे. मात्र सर्वांच्या आरोग्याचा विचार करून ही खबरदारी घेणे आवश्यक आहे. पुढील वषी भव्य प्रमाणात दसरोत्सव व सीमोल्लंघन साजरा केला जाईल, असे सांगितले. याप्रसंगी सुनील जाधव, लक्ष्मण किल्लेकर, नागेश नाईक, बळवंत शिंदोळकर, नामदेव नाईक, बाळू नाईक, प्रताप मोहिते, परशराम माळी, विजय तमुचे उपस्थित होते.
कॅम्प येथे सालाबादप्रमाणे दसऱयानिमित्त महामाता कुंतीदेवी व मरिअम्मा देवी यांची मिरवणूक काढण्यात आली. तथापि, प्रशासनाच्या मार्गसूचिनुसार व कोरोनाच्या नियमांचे पालन करून ही मिरवणूक मर्यादित स्वरुपाची करण्यात आली. कॅम्पमध्ये तेलगु कॉलनी, के. टी. पुजारी ऍण्ड सन्स फिश मार्केट, बी. मद्रास स्ट्रीट व आर. ए. लाईन यांच्यातर्फे एकूण पाच रथ काढले गेले. रथांवर पाच देवींच्या मूर्ती आरुढ झालेल्या होत्या. देवींची मिरवणूक कोणत्याही वाद्याशिवाय साधेपणाने काढण्यात आली. प्रशासनाच्या नियमांचे पालन करून मोजक्मयाच व्यक्तींच्या उपस्थितीत पूजा करण्यात आली. प्रथेनुसार सोंग सादर करणारे मिरवणुकीत सहभागी झाले होते.
शहापूर विठ्ठलदेव गल्लीतील वेंकटेश मंदिरातर्फे परंपरेनुसार रथ काढण्यात आला. मात्र, फक्त मोजक्मया व्यक्तींनी काही अंतरापर्यंत रथ ओढला. वेंकटेश्वराच्या मूर्तीची तसेच रथाची फुलांनी सजावट करण्यात आली होती. दरवषी हा रथ शहापूर परिसरातील महत्त्वाच्या गल्ल्यांमध्ये फिरून मंदिरापर्यंत येतो. यंदा प्रशासनाने गर्दीवर व सार्वजनिक सोहळय़ांवर निर्बंध घातल्याने रथांची मिरवणूक साधेपणाने काढण्यात आली. समादेवी मंदिरातर्फे समादेवीची पालखी काढण्यात आली. मात्र, गर्दी टाळून मोजक्मयाच व्यक्तींच्या उपस्थितीत पालखी काढली गेली.
दसऱयानिमित्त बाजारपेठेत मात्र बऱयापैकी गर्दी झाली. गांधीनगर फूल मार्केट येथे फुलांची प्रचंड आवक झाली. फूल विपेत्यांनी ही फुले खरेदी करण्यासाठी लक्षणीय गर्दी केली. तेथून हे विपेते शहर परिसरात फिरून किंवा मार्केटमध्ये बसून फुले विक्री करतात. दसऱयानिमित्त झेंडू, शेवंती या फुलांना मागणी होती. शेवंतीमध्ये अनेक नमुने आणि रंग उपलब्ध असून सजावटीसाठी त्यांचा उपयोग केला गेला.
तथापि, मागणी वाढल्याने फुलांच्या दरात वाढ झाली. मध्यम आकाराचा हार 150 रुपयांपासून उपलब्ध होता. फुलांचे माप 20 ते 25 रुपये, माळ 20 रुपये हात असे दर वाढले. याबरोबरच आंब्याची पाने, आपटय़ाची पाने यांचीही ठिकठिकाणी विक्री झाली. काही ठिकाणी कोहाळे फोडण्याची किंवा घरामध्ये, दुकानामध्ये टांगून ठेवण्याची परंपरा आहे. त्यामुळे बाजारपेठेत कोहाळय़ांची आवक वाढली होती. भाजीचे दर चढेच असून, ग्राहकांनी आवश्यक तेवढीच खरेदी केली. सायंकाळी परस्परांना सोने देताना विशेष काळजी घेतल्याचे दिसून आले.