नवी दिल्ली
भारताच्या अर्थव्यवस्थेत परकीय चलन साठय़ाचे महत्त्व सर्वाधिक असून 6 ऑगस्टला संपलेल्या आठवडय़ामध्ये परकीय चलन साठय़ात 88.9 कोटी रुपयांची भर पडली असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर परकीय चलन साठा 621.464 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार 30 जुलैला संपलेल्या आठवडय़ात 9.427 अब्ज डॉलर्सची भर पडली होती. यावेळी 620.576 अब्ज डॉलर्सपर्यंत परकीय चलन साठा पोहोचला होता.