वृत्तसंस्था / तेल अवीव
जगभरात परग्रहवासियांच्या अस्तित्वावरून चर्चा होत असते.अशास्थितीत इस्रायलचे माजी अंतर्गत सुरक्षा प्रमुख हाइम इशेद यांनी चकीत करणारे विधान केले आहे. परग्रहवासियांचे
अस्तित्व असून ते अमेरिका आणि इस्रायलच्या संपर्कात कित्येक वर्षांपासून आहेत. त्यांची गॅलेक्टिक फेडरेशनही असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांचा हा दावा संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारा आहे.
गॅलेक्टिक फेडरेशनचा मंगळ ग्रहावर एक आधारही आहे. तेथे त्यांचे सर्व निर्णय होतात. परग्रहवासियांविषयी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही माहिती असल्याचा दावा 87 वर्षीय हाइम यांनी एका नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
माहिती देण्यापासून रोखले : ट्रम्प एकवेळ परग्रहवासियांविषयी
संपूर्ण जगाला माहिती देऊ पाहत होते. परंतु गॅलेक्टिक फेडरेशनने त्यांना रोखले होते. माणसाला आता यासंबंधी माहिती देण्याची वेळ आलेली नाही. माणसाला अंतराळासंबंधी आणखी अधिक माहिती प्राप्त करू द्यावी. सामुहिक उन्माद रोखण्याची प्रार्थना परग्रहवासीय करतात. अंतराळ म्हणजे काय हे समजण्याच्या टप्प्यात मानवतेला पोहोचावे लागणार असल्याचे फेडरेशनचे म्हणणे असल्याचा दावा हाइम यांनी केला आहे.