लॉकडाऊनच्या भीतीने परजिल्ह्यातून जिल्ह्यात येणाऱ्यांत वाढ, शहरात येणाऱ्यांची प्रवेशद्वारावर कोरोना तपासणी गरजेची
प्रतिनिधी/कोल्हापूर
मुंबई, पुण्यासह शेजारील जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. लॉकडाऊनच्या भीतीने अनेकांनी गावपंढरीची वाट धरली आहे. परजिल्ह्यातील कोरोना रूग्ण उपचारार्थ जिल्ह्यात येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे. सीपीआर हॉस्पिटलमध्ये रविवारी परजिल्ह्यातून चार पॉझिटिव्ह रूग्ण उपचारासाठी आले, त्यामुळे शहर, जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होण्याचा धोका वाढला आहे.
जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांत कोरोनाने 24 जणांचा बळी घेतला, दैनंदिन सरासरी रूग्ण संख्या शंभरावरून सरासरी 160 ते 180 वर पोहोचली आहे. यामध्ये शहरातील पॉझिटिव्ह रूग्णसंख्या अधिक आहे. शहरातील काही हॉस्पिटलमध्ये कोरोना रूग्णांवर स्वतंत्र वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. सीपीआर हॉस्पिटलमध्ये सध्या 225 बेड कोरोना रूग्णांसाठी उपलब्ध केले आहेत. तरीही सक्रीय रूग्णांची संख्या वाढत आहे. दोन दिवसांत सक्रीय रूग्णसंख्येने 1 हजारांचा आकडा ओलांडला आहे. त्यामुळे धोका वाढल्याची भीती व्यक्त होत आहे.
गेल्या तीन दिवसांत कोरोनाने 12 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कोरोना रूग्ण दिसून येत आहेत. पुण्यामुंबईसह सातारा, सांगली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोरोना रूग्ण वाढले आहेत. लॉकडाऊनची भीतीही वाढत आहे. त्यामुळे अनेकांनी गावपांढरीकडे धाव घेतली आहे. गतवर्षी कोरोना रूग्ण वाढत असताना जिल्ह्यात, शहरात येणाऱया प्रवेशद्वार, नाक्यांवर कोरोना तपासणी सुरू केली होती. आताही परजिल्ह्यातून येणाऱयांची वाढती संख्या पाहता असा तपासणी नाक्यांची आवश्यकता वाढली आहे.
जिल्ह्यात रविवारी सांयकाळी महाबळेश्वर येथील चार पॉझिटिव्ह रूग्ण उपचारार्थ सीपीआरमध्ये दाखल झाले, शेजारील जिल्हÎातील एका तरूणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तोही उपचारार्थ अपघात विभागात आला. गेली काही दिवस जिल्ह्यातील कोरोना रूग्णांमुळे सीपीआर हॉस्पिटल हॉऊसफुल्ल झाले आहे. आता बेडही वाढवले आहेत. पण परजिल्ह्यातून येणाऱया पॉझिटिव्ह रूग्णांमुळे सीपीआरवरील ताण वाढणार आहे. त्यामुळे प्रशासनाने जिल्हÎात हेल्थ सेंटर डीओटी सेंटर तातडीने सुरू करण्याची मागणी वाढली आहे.