प्रतिनिधी/ खेड
गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी मध्य, पश्चिम व दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने 16 सप्टेंबरपासून आणखी 10 गणपती स्पेशल गाडय़ा चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
मडगाव-पनवेल 16 स्पटेंबर रोजी मडगाव येथून सकाळी 5.20 वाजता सुटून त्याचदिवशी सायंकाळी 5.20 वाजता पनवेलला पोहोचेल. परतीच्या प्रवासात 19 सप्टेंबर रोजी सकाळी 6.50 वा. सुटून त्याचदिवशी रात्री 8 वा. मडगावला पोहोचेल. 20 डब्यांच्या स्पेशलला करमाळी, थिविम, सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, नांदगाव, वैभववाडी, राजापूर, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर, आरवली, सावर्डे, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. पनवेल-रत्नागिरी स्पेशल 16 रोजी सायं. 6.30 वाजता पनवेल येथून सुटून दुसऱया दिवशी मध्यरात्री 2 वा. रत्नागिरीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात 17 रोजी सकाळी 9.30 वाजता रत्नागिरी येथून सुटून सायंकाळी 5.20 वा. पनवेलला पोहोचेल. 20 डब्यांच्या स्पेशलला रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, चिपळूण, सावर्डे, आरवली, संगमेश्वर आदी स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
पनवेल-कुडाळ स्पेशल 17 रोजी धावेल. पनवेल येथून सायं. 6.30 वाजता सुटून दुसऱया दिवशी पहाटे 5 वाजता कुडाळला पोहोचेल. 18 रोजी कुडाळ येथून सायं. 7.50 वाजता सुटून दुसऱया दिवशी सकाळी 6 वा. पनवेलला पोहोचेल. 20 डब्यांची ही गाडी रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग आदी स्थानकांवर थांबेल. मडगाव-पनवेल स्पेशल 16 रोजी दुपारी 2.40 वाजता मडगाव येथून सुटेल. दुसऱया दिवशी 2.50 वाजता पनवेलला पोहोचेल. 19 रोजी पनवेल येथून सायं. 6.10 वाजता सुटून दुसऱया दिवशी सकाळी 7 वा. मडगावला पोहोचेल. 20 डब्यांची ही गाडी करमाळी, थिविम, सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, नांदगाव, वैभववाडी, राजापूर, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर, आरवली, सावर्डे, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा स्थानकांवर थांबेल.
पनवेल-रत्नागिरी स्पेशल 17 रोजी धावेल. पनवेल येथून सकाळी 4.45 वा. सुटून 12 वा. रत्नागिरीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात दुपारी 3 वा. रत्नागिरी येथून सुटून रात्री 11.10 वा. पनवेलला पोहोचेल. 20 डब्यांची पनवेल-रत्नागिरी स्पेशल 18 रोजी धावणार आहे. रात्री 12 वाजून 15 मिनिटांनी पनवेल येथून सकाळी 7.30 वाजता रत्नागिरीला पोहोचेल. 01593/01594 क्रमांकाची 20 डब्यांची पनवेल-कुडाळ स्पेशल 18 रोजी धावेल. पनवेल येथून सायं. 6.30 वाजता सुटून पहाटे 5 वाजता कुडाळला पोहोचेल. परतीच्या प्रवासात 19 रोजी कुडाळ येथून सकाळी 7 वा. सुटून सायं. 5.15 वाजता पनवेलला पोहोचेल.
मडगाव-पनवेल स्पेशल 19 रोजी सायं. 6 वाजता मडगाव येथून सुटेल. दुसऱया दिवशी पहाटे 4.40 वाजता पनवेलला पोहोचेल. परतीच्या प्रवासात 20 रोजी पनवेल येथून पहाटे 5.35 वाजता सुटून सायं. 6.45 वा. मडगावला पोहोचेल. या स्पेशलला 22 डबे जोडण्यात येणार आहेत. 01599 क्रमांकाची मडगाव-विलासपूर स्पेशल 21 रोजी धावेल. ही 20 डब्यांची स्पेशल मडगाव येथून रात्री 8 वा. सुटून तिसऱया दिवशी मध्यरात्री 3.10 वाजता विलासपूरला पोहोचेल.
मडगाव-उधना सुपरफास्ट 20 रोजी धावणार
मडगाव-उधना सुपरफास्ट स्पेशल 20 रोजी धावणार आहे. 20 डब्यांची ही स्पेशल वसईमार्गे धावणार आहे. मडगाव येथून सकाळी 11.30 वाजता सुटून दुसऱया दिवशी पहाटे उधना येथे पोहोचेल. कोकण मार्गावर सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी, राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर, सावर्डे, चिपळूण, खेड, रोहा, पनवेल आदी स्थानकांवर धावेल.