ओमायक्रानच्या अनुषंगाने परदेशातून प्रवास करणाऱयांवर करडी नजर
प्रतिनिधी/ सातारा
दक्षिण अफ्रिकेत उद्भवलेल्या ओमायक्रॉन हा विषाणू सातारा जिह्यात उद्भवू नये याकरता राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार दि. 29 पासून जिह्यात परदेशातून जे प्रवास करुन आलेले आहेत. त्यांचे ट्रकिंग सुरु करण्यात आले आहे. त्यासाठी प्रशासनाकडून एक पथक नेमले आहे. त्या पथकाकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. शनिवारपर्यंत 40 जणांचा शोध घेण्यात आला असून त्यांना त्यांच्याच घरात विलिगीकरणात ठेवण्यात आले आहे.
कोरोनाची दुसरी लाट कमी झाली आहे. त्यामध्ये नुकताच दक्षिण अफ्रिकेत उद्भवलेल्या नव्या ओमायक्रान या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर जिह्यात सतर्कता बाळगली जात आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ज्या ज्या मार्गदर्शक सूचना राज्य शासनाच्या आदेशानुसार दिल्या गेल्या आहेत. त्यानुसार जिह्यात दि. 29 नोव्हेंबरपासून परदेशातून विमान प्रवास करुन कोण कोण आले आहे. त्यांचा शोध घेतला जात आहे. त्यांच्यावर करडी नजर ठेवण्यात येत आहे. अशी 40 जण जिह्यात आतापर्यंत प्रशासनाला आढळून आले असून त्यांना त्यांच्याच घरात गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांचे स्वॅब घेऊन तपासणीला पाठवण्यात आले आहेत. नव्याने कोण परदेश दौऱयावरुन येत आहे त्यांचीही माहिती गोळा केली जात असून खबरदारी म्हणून त्यांना त्यांच्याच घरात वेगळे ठेवले जात आहे. त्याकरता एका पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. हे पथक प्रत्यक्षात परदेश दौऱयावरुन आलेल्यांची माहिती संकलित करण्यापासून त्याचे स्वॅब घेऊन ते प्रयोगशाळेत पाठवणे हे काम करत आहे.