बळ्ळारी/प्रतिनिधी
बळ्ळारी येथे परदेशातून आलेल्या दोघांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ते दोघेही गेल्या आठवड्यात परदेशातून बळ्ळारीला आले आहेत. ज्यावेळी एरपोर्टमध्ये या दोघांची तपासणी केल्यानंतरत्यांचा अहवाल नकारात्मक आला होता. परंतु बळ्ळारीमध्ये आल्यानंतर एका व्यक्तीमध्ये कोविड संसर्गाची चिन्हे दिसली. जेव्हा कोविडची पुन्हा तपासणी केली तेव्हा त्या दोघांनीही दक्षिण आफ्रिकेतील नवीन विषाणूची लागण झाल्याचे निदर्शनास आले. दोघेही परदेशातून आले आहेत. यातील एक दुबईहून आला आहे तर दुसरा कोणत्या देशातून आला आहे, हे माहिती नाही.
गेल्या वर्षी मार्चच्या उत्तरार्धात प्रथम प्रकरण उघडकीस आले होते. तेथून आजपर्यंत जिल्ह्यात ५ लाख ५२ हजार३७४ जणांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये ३९ हजार ३६९ लोकांमध्ये कोरोना संसर्ग आढळला आहे. यापैकी ३८ हजार ६७९ लोक बरे झाले आहेत. उर्वरित ५९७ लोकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.